कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती सुरु !
Shivaji University Kolhapur Recruitment 2024 :
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी भरती जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख म्हणून निघून देण्यात आली आहे. दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी मुलाखत फेरी पार पडेल. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. पात्रतेचे निकष अधिक जाणून घेऊ.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या एका रिक्त पदासाठी घोषित करण्यात आली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. चिफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करायचा आहे.
या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवाराची निवड केली जाईल. ही मुलाखत फेरी दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडेल. ही मुलाखत फेरी दुपारी बारा वाजल्यापासून पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये पार पडेल. मुलाखत फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी त्यादिवशी नियोजित वेळेवर आणि नियोजित स्थळी उपस्थित राहणे फार महत्त्वाचे असे.
Eligibility Criteria पात्रता निकष :
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक
- शैक्षणिक क्षेत्र / ट्रेनिंग प्रोग्राम्स / स्टार्ट अप इकोसिस्टीम / प्लॅनिंग अँड ऑपरेटिंग इंक्युबॅशन सेंटर यापैकी कोणत्याही क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक.
- मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.
- वय वर्ष ४० व त्यावरील वय असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
वरती नमूद केलेल्या पात्रतेचे निकष पाळून इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज सादर करावा. अर्जासोबत या सर्व निकषांची हमी देणारी प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठातील सदर भरतीत अर्ज सादर करतेवेळी तो संपूर्ण भरलेला आहे तसेच त्यातील सर्व माहिती खरी आहे याची ती करून मगच तो अर्ज जमा करावा. अपूर्ण सादर केलेला अर्ज किंवा खोटी माहिती भरुन सादर केलेला अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.