स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने हिंदी भाषेवर कमांड असणाऱ्या अनेक जणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
SSC JHT Recruitment 2024 :
जर तुम्ही नोकरी शोधात आहात? आणि तुम्हाला हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर (JHT) म्हणून काम करता येणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने हिंदी भाषेवर कमांड असणाऱ्या अनेक जणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे. जर तुम्ही नोकरी शोधात आहात? आणि तुम्हाला हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर (JHT) म्हणून काम करता येणार आहे. SSC द्वारे ३१२ JHT पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, त्याचबरोबर इच्छुक आणि हिंदी भाषेत कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्जप्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात होणार असून उमेदवारांना SSC च्या अधिकृत संकेतस्थळी म्हणजेच ssc.gov.in वर अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑगस्टच्या २ तारखेला सुरु झाली आहे. तर ऑगस्टच्या २५ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. सबमिट केलेल्या अर्जाच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी असल्यास सप्टेंबरच्या ४ ते ५ तारखेपर्यंत त्याला एडिट करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर २६ ऑगस्टपर्यंत अर्जशुल्क भरण्यात यावे असल्याचे निर्देश SSC ने दिले आहेत. कॉम्पयुर बेस्ड परीक्षा ऑक्टॉबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांना काही अटीशर्तींचा सामना करावा लागणार आहे. प्रथम अट वयोमर्यादे विषयक आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांचे वय १८ ते ३० दरम्यान असावे अशी SSC ची अट आहे. तर अर्जकर्त्या उमेदवाराला हिंदी तसेच इंग्रजी दोन्ही भाषेत उत्तम प्रभुत्व असायला पाहिजे. निवड प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षेचा समावेश आहे. ही परीक्षा ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेत उमेदवाराचे हिंदी तसचे इंग्रजी भाषेतील ज्ञान तपासले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ssc.gov.in संकेतस्थळी भेट द्यावी लागेल. SC/ ST/ PwBD प्रवर्गातील उमेदवारांना तसेच महिलांना अर्ज शुल्क माफ आहे तर इतरांना १०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे.