सरकारी क्षेत्रात १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुर्वणसंधी !

सरकारी क्षेत्रात १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुर्वणसंधी !

SSC Recruitment 2024 :

MTS तसेच हवालदाराच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची मुदत संपत आली आहे, तर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. १०वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना देखील सरकारी क्षेत्रांतील विविध विभागात काम करता येणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मल्टि-टास्किंग स्टाफ (Non-Technical/ MTS) कामांसाठी सरकारी क्षेत्रांत कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संबंधित माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या अधिकृत संकेतस्थळ ssc.gov.in वर जारी करण्यात आली होती. अर्ज करण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली असून. महत्वाचे म्हणजे, या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ होती, परंतु अर्ज करण्याची मुदत वाढवून तारीख ३ ऑगस्टवर ढकलण्यात आली होती. रिक्त जागांसाठी अनेक व्यक्तींनी मोठ्या संख्येने अर्ज केला आहे, जर कुणी अद्याप अर्ज करू शकले नाही आहे. तर आजची दिनांक अंतिम असल्यामुळे वेळ अजून गेली नाही आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच्या आज लवकर अर्ज करण्यात यावे.

यंदा MTS तसचे हवालदाराच्या पदासाठी एकूण ९५८३ जागा रिक्त आहेत. यातील ६१४४ जागा MTS साठी रिक्त असून ३४39 जागा हवालदाराच्या पदासाठी शिल्लक आहेत. अर्ज कर्त्या उमेदवारांना ऑगस्टच्या १६ ते १७ तारखेपर्यंत फॉर्ममध्ये सुधार असल्यास एडिट करता येणार आहे. विशेष म्हणजे याबदल्यात करेक्शन फीस आकारली जाईल. कम्प्युटर बेस्ड परीक्षा ऑक्टॉबर नोव्हेंबर मध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. तर लिखित परीक्षा दोन फेसमध्ये होतील. विशेष म्हणजे ४५-४५ मिनिटांचे असलेले दोन्ही सेशन एकाच दिवसात घेण्यात येतील. इंग्रजी, हिंदी सह भारतातील इतर कोणत्याही १३ भाषांमध्ये ही परीक्षा देण्याची मुभा आहे.

MTS पदांतील रिक्त जागेंसाठी अर्ज कर्त्या उमेदवारांना निवड झाल्यास पियुन, पहारेकरी, माळी, गेटकिपर म्हणून केंद्र सरकारच्या विभिन्न विभागात काम करता येईल. MTS तसेच हवालदार या दोन्हीपदांसाठी उमेदवाराने किमान १०वी पास करणे गरजेचे आहे. MTS साठी वयाची अट १८ वर्षे ते २५ वर्षे असावे तर हवालदाराच्या पदासाठी आयु १८ वर्षे ते २७ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्ज करते वेळी १०० रुपये अर्जशुल्क आकारण्यात येईल दरम्यान महिला तसेच एसटी/ एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.

 

Leave a Comment