कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
- वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)
एकूण जागा – 990
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगार
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्क
महिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही
इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-