विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण !
Students will get free education till 12th standard :
शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. परंतु आजकाल शिक्षण खूप महाग झालेले आहे. अगदी लहान लहान मुलांना देखील 30 ते 40 हजार रुपये फी असते. अगदी मराठी शाळामधून शिकायचे म्हटले, तरी खूप जास्त पैसे लागतात. अनेक लोकांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी गुणवंत असून देखील त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. आणि त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. आपले सरकार हे विद्यार्थ्यांसाठी नवीन वेगवेगळ्या योजना आणत असतात. अशातच आता या समस्येवर उपाय म्हणून शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक स्कॉलरशिप योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी या आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये. यासाठी सरकारने अनेक स्कॉलरशिप योजना राबवल्या आहेत.
आजकाल अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण नव्हे तर बारावीपर्यंत शिक्षण घेणे देखील कठीण होते. यासाठीच आता जवाहर नवोदय विद्यालय मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. या विद्यालयामध्ये होतकरू विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत अगदी उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापासून शिक्षणापर्यंत सगळे फ्रीमध्ये असते. या विद्यालयात पाचवीपासून ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते आणि यासाठी पालकांना एक रुपया देखील खर्च केला करावा लागत नाही.
या जवाहर नवोदय विद्यालयाचे सगळे काम नियोजन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले जाते. या विद्यालयात प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चांगले शिक्षण मिळावे हा मुख्य हेतू आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळतो. या नवोदय विद्यालयामध्ये सहावी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो मध्ये कोणत्याही वर्गात प्रवेश मिळत नाही.
या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावे लागते. या परीक्षेचे स्वरूप अगदी सोपे असते. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यश प्राप्त करतात. जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात. त्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. या विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधारे या विद्यालयात प्रवेश मिळवता येतो. या विद्यालयात ग्रामीण भागातील 75 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर शहरी भागातील 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो यासाठी पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच या विद्यालयात प्रवेश मिळतो.
या विद्यालयात प्रवेश झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. याचा सगळा खर्च केंद्र सरकार करते. जवळपास सात वर्ष तुम्हाला या विद्यालयात मोफत शिक्षण घेता येते. विद्यालयात राहण्यापासून खाण्यापर्यंत व या पुस्तके बॅग गणवेश सगळे विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत. त्या देखील सरकार मार्फत मोफत दिल्या जातात.
अर्ज कसा करायचा
शैक्षणिक वर्ष 2025 – 26 साठी नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी प्रवेश अर्ज भरायचा आहे. 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.