Supreme Court of India Recruitment 2021

सर्वोच्च न्यायालयात ८, तर उच्च न्यायालयांत ४५४ न्यायाधिशांची पदे रिक्त !

Supreme Court of India Recruitment 2021 –There are 8 vacancies in the Supreme Court and 454 vacancies in the High Court. There are more than 5,000 vacancies in District Courts and subordinate courts. The central government gave this information in response to a question in the Lok Sabha on July 28. The total number of judges in the Supreme Court is 34. Out of which 8 posts are vacant. Out of the current 26 judges, 25 are male and 1 is female.

सर्वोच्च न्यायालयात ८, तर उच्च न्यायालयांत ४५४ न्यायाधिशांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा न्यायालये आणि त्याखालील न्यायालयांत ५ सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारने २८ जुलै या दिवशी लोकसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण संख्या ३४ इतकी आहे. त्यांपैकी ८ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या २६ न्यायाधिशांपैकी २५ पुरुष, तर १ महिला न्यायाधीश आहे.

जिल्हा न्यायालये आणि त्याखालील न्यायालयांत ५ सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची पदे रिक्त !

केंद्र सरकारने सांगितले की, देशातील सर्व उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांची एकूण संख्या १ सहस्र ९८ इतकी असून त्यांपैकी ४५४ पदे रिक्त आहेत. यांपैकी सर्वाधिक रिक्त पदे ही अलाहाबाद उच्च न्यायालयात असून त्याची संख्या १६० इतकी आहे, तर सिक्कीम उच्च न्यायालयात सर्वांत अल्प, म्हणजे ३ न्यायाधिशांची पदे रिक्त आहेत. सध्या देशातील सर्व उच्च न्यायालयांत ६४४ न्यायाधीश कार्यरत असून त्यांपैकी ५६७ पुरुष, तर ७७ महिला न्ययाधीश आहेत.

सर्वोच्च न्यायालयात १ मार्च २०२१ पर्यंत ६६ सहस्र ७२७ खटले प्रलंबित आहेत, तर देशातील २५ उच्च न्यायालयांत ५७ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असल्याचीही माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. या ५७ लाखांहून अधिक खटल्यांपैकी ४० टक्के खटले हे ५ वर्षांहून अधिक कालावधीतील आहेत. एकूण प्रलंबित खटल्यांपैकी ५४ टक्के खटले हे केवळ अलाहाबाद, पंजाब आणि हरियाणा, मद्रास, मुंबई, तसेच राजस्थान या ५ उच्च न्यायालयांतील आहेत


सुप्रीम कोर्टात मिळवा नोकरी; भाषांतरकारांच्या पदांसाठी भरती

Supreme Court of India Recruitment 2021 – The Supreme Court of the country has issued notification for the recruitment of Junior Translator. There is a total of 30 vacant posts to be filled under SCJ Recruitment 2021. If you have knowledge of the language and are well educated in it, then you have a golden opportunity to get a job in SCJ. The last date for applying is 13th March 2021. Notification and application links for Supreme Court of India Recruitment 2021 are provided below

Supreme Court of India Bharti 2021 – जर तुम्हाला भाषेचे ज्ञान आहे आणि त्यातील योग्य शिक्षण घेतले आहेत, तर तुम्हाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नोकरी (Govt Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) कोर्ट असिस्टंट (Court Assistant) / ज्युनियर ट्रान्सलेटर (Junior Translator) च्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या पदांवर नियुक्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखतीत यशस्वी व्हावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचा अनुवाद इंग्रजीतून संबंधित भाषेत करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्जाच्या लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत.

 • पदाचे नाव – कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रान्सलेटर)
 • पदांची संख्या – ३०
 • वेतनश्रेणी – ४४,९०० रुपये प्रति महिना (लेवल-७ नुसार अन्य भत्त्यांसह वेतन मिळेल.)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२१

कोणत्या भाषेसाठी भाषांतरकारांची किती पदे?

 • इंग्लिश मधून हिंदी – ०५
 • असामी – ०२
 • बंगाली – ०२
 • तेलुगू – ०२
 • गुजराती – ०२
 • ऊर्दू – ०२
 • मराठी – ०२
 • तमिळ – ०२
 • कन्नड – ०२
 • मल्याळम – ०२
 • मणिपुरी – ०२
 • उडिया – ०२
 • पंजाबी – ०२
 • नेपाळी – ०१

आवश्यक पात्रता- Education Criteria For SCJ Bharti 2021

 • इंग्लिश व संबंधित भाषेसह पदवी आवश्यक. भाषांतरातील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणे अनिवार्य.

वयोमर्यादा

 • वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे वयापर्यंत. केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

कसा कराल अर्ज ? How To Apply For SCJ JT Online Application 2021

सुप्रीम कोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर व्हेकेंसी (SC Court Assistant vacancy) साठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. १५ फेब्रुवारी २०२१ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ मार्च २०२१ आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांसाठी २५० रुपये अर्ज शुल्क आहे. पुढे दिलेल्या लिंकच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SCJ Bharti 2021

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment