Teachers Bharti 2021 India – Shikshak Bharti 2021 Details – सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना त्यांचं स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झालीय. पंजाब सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं Punjab School Education Department (ERBP) पूर्व प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात एक मोठी घोषणा केलीय. माहितीनुसार, ही शिक्षक भरती एकूण 8,393 पदांसाठी होईल. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं अधिकृत अधिसूचनाही जारी केलीय. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आलीय. दरम्यान, अद्याप अर्ज प्रक्रियेची अधिकृत लिंक उपलब्ध झाली नसली, तरी ती लवकरच अर्जदारांसाठी उपलब्ध होणार असल्याचे कळतेय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवार शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकतात.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक (12 वी) किंवा इतर समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त नर्सरी टीचर एजुकेशनमध्ये (NCTE) डिप्लोमा केला असावा. याशिवाय, उमेदवाराने दहावीत पंजाबी विषयाचा अभ्यासही केलेला असावा.
वयोमर्यादा : पूर्व प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2020 पासून मोजले जाईल. तसेच उमेदवाराचे किमान वय 21 आणि कमाल वय 35 वर्षे असावे. शासकीय नियमानुसार, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल.
अर्जासाठी आवश्यक फी : या पदांकरिता अर्ज करण्यासाठी सामान्य वर्ग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागेल. याशिवाय, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. माजी सैनिकांसाठी हा अर्ज विनामूल्य ठेवण्यात आलाय.
Important Links For Shikshak Bharti 2021 |
|
Apply Online & Details |