टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये सध्या ‘प्रधान अधिकारी’ [Principal Officer] या पदावर भरती होणार!

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये सध्या ‘प्रधान अधिकारी’ [Principal Officer] या पदावर भरती होणार!

TJSB Sahakari Bank recruitment 2024 : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये सध्या ‘प्रधान अधिकारी’ [Principal Officer] या रिक्त पदावर भरती होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी प्रधान अधिकारी या पदासाठी अर्ज कसा करावा, तसेच या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय, पात्रता निकष काय आहेत ते जाणून घ्या.

वयोमर्यादा : टीजेएसबी सहकारी बँकेतील प्रधान अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय हे ‘५०’ वर्षांपेक्षा कमी असावे.

शैक्षणिक पात्रता : प्रधान अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शिक्षण असावे.

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे CAIIB असे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे एएमएल / केवायसी / सीएफटी [AML / KYC / CFT] यामध्ये व्यावसायिक सर्टिफिकेशन असावे.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड अधिकृत वेबसाईट : https://www.tjsbbank.co.in/

अर्ज आणि अर्जाची प्रक्रिया
प्रधान अधिकारी या पदावर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल – careers@tjsb.co.in
अर्ज पाठविताना उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.
तसेच अर्ज भरताना त्यामध्ये दिलेली माहिती पूर्ण आणि अचूक आहे याची उमेदवारांनी खात्री करून घ्यावी.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही २७ मार्च २०२४ अशी आहे.

Leave a Comment