UPSC नागरी सेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !
UPSC Exam 2024 Time Table Released :
UPSC नागरी सेवा परीक्षेचे आयोजन २० सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असून परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शेड्युल पाहण्यासाठी लेख नक्की वाचा.
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) नागरी सेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन २० सप्टेंबर, २०२४ ते २९ सप्टेंबर, २०२४ तारखेदरम्यान करण्यात येणार आहे. परीक्षा २ शिफ्टमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या शिफ्टची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल तर दुसऱ्या शिफ्टची वेळ दुपारी २:३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नागरी सेवेत रुजू होण्यासाठी देशभरातील अनके उमेदवार प्रयत्नशील आहेत. मुख्य परीक्षे अगोदर अर्जकर्त्या उमेदवारांची प्रीलियम्स आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेत एकूण १४,६२७ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. याच उमेदवारांना मुख्य परीक्षेत उपस्थित राहण्याची परवानगी आहे. प्रीलियम्स परीक्षेचा निकाल जुलैच्या १ तारखेला जाहीर झाला होता. मुळात UPSC नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण परीक्षेचे मार्फत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये केवळ १०५६ जागा रिक्त आहेत, परंतु परीक्षार्थी १४,६२७ आहेत.
UPSC CSE 2024च्या अंतर्गत, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) पदासाठी १८० जागा रिक्त आहेत, तर इंडियन पुलिस सर्व्हिस (IPS) पदासाठी एकूण १५० जागा शिल्लक आहेत. UPSC Civil Exam 2024 च्या माध्यमातून इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) च्या ५५ जागा भरल्या जातील. तर तिन्ही पदांमध्ये काही जागा आरक्षित प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. या परीक्षेमार्फत नागरी सेवेतील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
२० सप्टेंबर २०२४
सकाळी (९ ते १२) – पेपर १ – निबंध
दुपारी (२:३० ते ५) – NO EXAM
२१ सप्टेंबर २०२४
सकाळी (९ ते १२) – पेपर 2 – जीएस 1
दुपारी (२:३० ते ५) – पेपर 3 – जीएस २
२२ सप्टेंबर २०२४
सकाळी (९ ते १२) – पेपर 4 – जीएस 3
दुपारी (२:३० ते ५) – पेपर 5 – जीएस 4
२८ सप्टेंबर २०२४
सकाळी (९ ते १२) – भारतीय भाषा
दुपारी (२:३० ते ५) – पेपर बी – इंग्रजी
२९ सप्टेंबर २०२४
सकाळी (९ ते १२) – पेपर 6 – ऑप्शनल विषय -१
दुपारी (२:३० ते ५) – पेपर 7 – ऑप्शनल विषय -२