बँकिंग टेक्नॉलॉजीमधील शिक्षणाची संधी !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित दि इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी ( IDRBT) (डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, भारत सरकार मान्यताप्राप्त सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन). बँकिंग तंत्रज्ञानाचे विशिष्ट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा विशेषत संगणकाचा वापर करण्यात जाणकार/प्रवीण व्यावसायिक तयार करण्यासाठी IDRBT ने जुलै २०१६ पासून १ वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी ( PGDBT) सुरू केला आहे. जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या PGDBT कोर्स च्या ८ व्या बॅचकरिता प्रवेश.
प्रवेश क्षमता – ४०. (यातील १० जागा बँकिंग आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स प्रायोजित (sponsored) उमेदवारांसाठी राखीव.)
PGDBT कोर्स ४ टर्म्समध्ये विभागलेला असेल.
पात्रता – (दि. ३० जून २०१४ रोजी) फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग पदवी किंवा फर्स्ट क्लास पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
आणि GATE/ CAT/GMAT/GRE/ CMAT/ XAT/MAT/ATMA स्कोअर धारण केलेला असावा. (ही अट बँक्स आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स प्रायोजित उमेदवारांना लागू नाही.)
निवड पद्धती – ग्रुप डिस्कशन पर्सोनल इंटरह्यू ( GDPI) मधील कामगिरीवर आधारित उमेदवारांची निवड केली जाईल.
प्रोजेक्ट वर्कसह कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी (PGDBT) बहाल केला जाईल.
कोर्स फी – रु. ५ लाख (अधिक लागू असलेले टॅक्स) कोर्स फीमध्ये शिक्षण, कोर्स मटेरियल आणि IDRBT च्या बेगमपेट, हैदराबाद येथील क्वार्टर्समधील सामायिक निवास यांचा खर्च समाविष्ठ आहे.
कोर्स फी चार समान हप्त्यांमध्ये प्रत्येक टर्मच्या सुरुवातीस भरता येईल.
उमेदवारांना रु. १०,०००/- कॉशन डिपॉझिट भरावा लागेल.
गुणवत्ता – प्रत्येक बॅचमधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास Dr. A. S. Ramasastri सुवर्णपदक दिले जाईल. गुणवान उमेदवारांना प्रोजेक्ट कालावधीमध्ये स्टायपेंड दिले जाईल.
१०० टक्के प्लेसमेंट – तिसरी टर्म पूर्ण होण्यापूर्वीच PGDBT च्या सर्व उमेदवारांना सरासरी रु. ९लाख (प्रती वर्ष) पॅकेजवर प्लेसमेंट मिळून गेली आहे.ऑनलाइन अर्ज www.idrbt.ac.in/pgdbt वर दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी [email protected], फोन नं. 040-23294164; 8919132013; 9885885024; 9133689444.