रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती सुरु
Railway Bharti 2024 :
रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड फर्स्ट सिग्नलसाठी आणि टेक्निशियन ग्रेड थर्डच्या ९००० हून अधिक रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार आज ८ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी ९ मार्चपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
RRB टेक्निशियनभरती २०२४ मध्ये, टेक्निशियन ग्रेड फर्स्ट सिग्नलसाठी १०९२ आणि टेक्निशियन ग्रेड थर्डसाठी ८०५२ रिक्त जागा आहेत. रेल्वेच्या या बंपर भरतीसाठी अर्जदार १०वी आणि ITI उत्तीर्ण असावेत.
वयोमर्यादा
टेक्नीशियन ग्रेड फर्स्ट सिग्नल- १८ से ३६वय
टेक्नीशियन ग्रेड थर्ड- १८ से ३३ वय
SC/ST उमेदवाराला ५ वर्षे, OBC (नॉन-क्रिमी लेयर)३ वर्षे, माजी सैनिकांना ३ ते ८ वर्षे आणि PWD उमेदवारांना ८ ते १ वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क
SC/ST, माजी सैनिक, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांसाठी RRB टेक्निशिअन भरती २०२४ साठी अर्ज शुल्क २०पये आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी ५०० रुपये आहे.
अर्ज करण्याची लिंक – https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing