केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी!
केंद्रीय लोकसेवा आयोग ‘असिस्टंट कमांडंट’ ग्रुप ‘ए’ पदांच्या भरतीसाठी ‘सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट्स) एक्झामिनेशन २०२४’ ( CAPF – AC EXAM २०२४) दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी घेणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग ‘असिस्टंट कमांडंट’ ग्रुप ‘ए’ पदांच्या भरतीसाठी ‘सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट्स) एक्झामिनेशन २०२४’ ( CAPF – AC EXAM २०२४) दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी घेणार आहे. Examination Notice No. ०९/२०२४ CPF. एकूण रिक्त पदे – ५०६. (१० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.)
रिक्त पदांचा तपशील :
(१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) – १८६ पदे.
(२) सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) – १२० पदे.
(३) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) – १०० पदे.
(४) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) – ५८ पदे.
(५) सशस्त्र सीमा बल (एसएसबी) – ४२ पदे.
परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी (गोवा) इ. प्रथम येणाऱ्यास प्रथम या नियमाने उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडीची सोय असेल. चेन्नई, कलकत्ता, दिसपूर आणि नागपूर केंद्र वगळता इतर केंद्रांवर ठरावीकच उमेदवारांना सामावून घेतले जाऊ शकते. आपल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळविण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता – पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) अंतिम वर्षाचे उमेदवार जे २०२४ मध्ये परीक्षेस बसणार आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत. (पुरुष व महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र पात्रता इंटरह्यूच्या वेळी विचारात घेतली जाईल.
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०२४ रोजी २० ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३० वर्षेपर्यंत, केंद्र सरकारी कर्मचारी – ३० वर्षेपर्यंत)
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी. छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी. वजन – (उंची/वय यांच्या प्रमाणात) पुरुष – ५० किलो, महिला – ४६ किलो.
दृष्टी – (करेक्टेड व्हिजन) दूरची दृष्टी – चांगला डोळा ६/६ आणि खराब डोळा ६/१२; किंवा चांगला डोळा ६/९ आणि खराब डोळा ६/९. जवळची दृष्टी (करेक्टेड व्हिजन) एन/६, एन/९. (६ महिन्यांपूर्वी केलेली LASIK सर्जरी करेक्शन ग्राह्य धरली जाते.)
परीक्षा शुल्क – रु. २००/-. (महिला/ अजा/ अज यांना फी माफ आहे.) ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक १४ मे २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत. SBI मार्फत Pay by Cash ने फी भरण्यासाठी चलान डाऊनलोड करण्याचा अंतिम दि. १३ मे २०२४ रोजी (२३.५९ वाजे)पर्यंत.
SBI मध्ये फी दि. १४ मे २०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत) भरता येईल.
निवड पद्धती – (१) लेखी परीक्षा ४ ऑगस्ट २०२४. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना OMR उत्तरपत्रिका पुरविली जाईल. (पेपर-१ – वेळ सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत)
OTR प्रोफाईलमध्ये बदल/ सुधारणा करण्याची सुविधा तसेच ऑनलाइन अर्जात बदल करण्यासाठी (modification in Application Form) सुविधा दि. १५ मे ते २१ मे २०२४ (१७.३० वाजे)पर्यंत उपलब्ध असेल.ऑनलाइन अर्ज (पार्ट- I आणि पार्ट- II) https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १४ मे २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.