BECIL पदवीधारकांना नोकरीची संधी! आजच अर्ज करा
BECIL Recruitment 2024 :
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत १३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या दोन पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती तसेच वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, पगार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यात आला आहे.
पदसंख्या – कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या दोन पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा आहे.
कार्यकारी सहाय्यक – ११
कनिष्ठ फार्मासिस्ट – २
वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 40 वर्षे ठरविण्यात आली आहे.
अर्ज पद्धती – या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्ही १४ मे २०२४ पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.becil.com/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.
शैक्षणिक पात्रता – वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. वरील अधिसुचना वाचावी.
वेतन – वरील पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन देण्यात येईल.
कार्यकारी सहाय्यक – ३०,०००
कनिष्ठ फार्मासिस्ट – ३०,०००
Table of Contents