मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी!

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी!

MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘व्यवस्थापक’ [General Manager / Additional General Manager] पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी कुणी अर्ज करावा, पात्रता निकष, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती पाहा. तसेच नोकरीचा हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कि ऑफलाईन याचीही माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.

पद आणि पद संख्या :  मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक [फायनान्स] या पदासाठी १ रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता :  महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आवश्यक माहिती नोकरीच्या अधिसूचनेमध्ये वाचावी.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक – https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया :
महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी खालील ई-मेल ॲड्रेसचा वापर करावा – ई-मेल ॲड्रेस : managerhr@mrvc.gov.in.

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी ५५ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी नोकरीच्या अर्जात आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.

नोकरीच्या अर्जासह आवश्यक असल्यास महत्त्वाची कागदपत्रे जोडावी.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारीखेआधी पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ जून २०२४ अशी आहे.

नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरल्यास, तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी करावी.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या नोकरीसंबंधी अधिक माहिती उमेदवारास हवी असल्यास, त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Comment