सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024 :
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये विविध विभागामध्ये ४००० पदांसाठी मेघा भरती होणार आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना sealanemaritime.in.या अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे.
अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया ११ मार्च २०२४ रोजी सुरु झाली असून ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि अर्ज प्रकिया जाणून घेण्यासाठी अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो
भारतीय मर्चंट नेव्ही भरती २०२४साठी पात्रता निकष परीक्षा प्राधिकरणाने जाहीर केले आहेत.
पात्रता निकषांचे तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तपशीलवार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. भारतीय मर्चंट नेव्ही भरती पात्रता निकषांची ठळक वैशिष्ट्ये उमेदवार खाली तपासू शकतात.
भरतीचा तपशील
- भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
- पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
- एकूण रिक्त पदे – ४००० पदे
- अधिसूचना प्रसिद्धी तारीख – ११ मार्च २०२४
- अर्जाची पद्धत – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ मार्च २०२४
- श्रेणी – सरकारी नोकरी
- शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
- अधिकृत संकेतस्थळ – selanemaritime.in