आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटीचा आरोप!

सध्या  राज्यभरात आरोग्य विभागातील 54 वेगवेगळ्या पदांसाठी २८-०२- २०२१ रोजी दोन सत्रात पेपर घेण्यात आला. यात नागपूरच्या जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजातील केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. याबाबत त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून पेपर रद्द करण्याची मागणी केली आहे.

आरोग्य विभाग भरती अंतर्गत  रविवारी नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदांच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दोन सत्रात झाली. दुपारच्या सत्रात पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी व्हिडीओ काढून केला आहे. हा व्हिडिओ नागपुरातील असल्याचे परीक्षार्थींनी सांगीतले आहे.

या संदर्भातील पोलीस आयुक्तांना दिली लेखी तक्रार –

विविध परीक्षार्थींनी नागपूर पोलीस आयुक्तांना याबाबत लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीत वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिकांचे सील फोडण्यात आले. यावर आक्षेप घेतला असता दोघांना मारहाण केली असल्याचे सुद्धा नमूद केलेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती पोलीस आयुक्तांना केली आहे.

 

 

Leave a Comment