‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) प्रथम श्रेणी ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची मंजूर पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ही पदे लवकरच भरली जातील,’ असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वर्ग-१ ते वर्ग-४ ची २३०० मंजूर पदे आहेत. त्यापैकी १७२५ भरलेली पदे असून ५७५ रिक्त पदे आहेत. तसेच अतिविशेषोपचार रुग्णालयातील ‘गट-अ’ ते ‘गट-ड’ची २१९ पदे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे २२३ पदास आठ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन आदेशान्वये मान्यता दिली का, असे विचारले होते. औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयातील३६० रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली त्याचा तपशील चव्हाण यांनी विचारला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लेखी उत्तर दिले. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मंजूर पदांपैकी ८६८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून, औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रूग्णालयासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब विचाराधीन असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे घाटीतील ८६८ पदे लवकरच भरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून रिक्त जागांमुळे घाटीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. कंत्राटी पदे भरूनही पुरेसे काम झाले नसल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसोय वाढली आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू. धन्यवाद !