Aayakar Vibhag Bharti 2022

इनकम टॅक्स विभागाच्या स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी !!

Aayakar Vibhag Bharti 2022 : There is a golden opportunity for young candidates who have passed 10th and are looking for a government job. Various posts will be filled in the Income Tax department. For this, a notification has been published on the official website and the details of the educational qualification, age limit, experience, last date of application required for the post have been given.

A total of 24 vacancies for various posts including Tax Assistant and Multi Tasking Staff will be filled under the Sports Quota of Income Tax Department. The application process for these posts is underway. Talented players who have participated in national and international competitions can apply for these positions. The recruitment will be done through sports quota.

Income Tax Recruitment 2022

दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. आयकर विभागात (Income Tax department) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इनकम टॅक्स विभागाच्या स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत कर सहाय्यक (Assistant) आणि मल्टी टास्किंग स्टाफसह (Multi tasking Staff) विविध पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले प्रतिभावान खेळाडू या पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती क्रीडा कोट्यातून होणार आहे.सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफसह विविध रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अधिकृत वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे.

Income Tax Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर – १ पद
टॅक्स असिस्टंट – ५ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ – १८ पदे

शैक्षणिक पात्रता
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर- कोणत्याही शाखेतील पदवीधर.
टॅक्स असिस्टंट -कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवी आणि ८००० प्रति तासाच्या वेगाने डेटा एन्ट्री
मल्टी टास्किंग स्टाफ – दहावी पास

क्रीडा पात्रता
उमेदवाराने कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला असावा.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज किंवा इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत भाग घेतलेला असावा.
ऑल इंडिया स्कू गेम्स फेडरेशनद्वारे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत राज्य शालेय संघाकडून खेळलेला असावा.

वयोमर्यादा
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर – १८ ते ३० वर्षे
कर सहाय्यक – १८ ते २७ वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्षे

Aayakar Vibhag Bharti 2022 : अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment