Agnishamak Vibhag Pune Bharti 2022

२०११-१२ पासून अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची भरती नाही – ५१० रिक्त पदांवर भरती कधी ?

Agnishamak Vibhag Pune Bharti 2022Agnishamak Vibhag Pune Recruitment 2022 – At present only 383 employees are working in 14 centers operating in the city and 510 posts are vacant. Insufficient number of personnel puts extra work stress on them. Inadequate centers and manpower shortages are a major concern for the fire brigade.

✅सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

Agnishamak Vibhag Pune Recruitment 2022

‘नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे हद्द वाढ झालेल्या पुणे शहराला ७३ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत केवळ १४ अग्निशमन केंद्रांवर शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आहे,’ अशी माहिती पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि उद्योग व्यवसाय या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने येत्या काळात अग्निशमन सेवा वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे यातून स्पष्ट होते. महापालिकेमध्ये गेल्या वर्षी २३ गावांचा समावेश झाला. तर, त्यापूर्वी ११ गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरली आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ हे ५१६ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. त्याचबरोबर पुण्याच्या लोकसंख्येतही दहा ते बारा लाखांची भर पडली आहे. ‘शहरात दहा किलोमीटरच्या परिघात एका अग्निशमन केंद्राची गरज असून, झोपडपट्टी आणि औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी अग्निशमन केंद्रांची अधिक गरज असते. शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने एकूण ७३ अग्निशमन केंद्रे सुरू करण्याची गरज आहे,’ अशी माहिती पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

‘नवीन गावांच्या समावेशामुळे येत्या काळात अग्निशमन दलाच्या कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे; मात्र, अग्निशमन दलाची सध्याची यंत्रणा अपुरी पडत असताना, नवीन भार उचलण्यासाठी दलाचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.

सध्या शहरात कार्यान्वित असणाऱ्या १४ केंद्रांवर केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत आणि ५१० पदे रिक्त आहेत. जवानांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येतो. अपुरी केंद्रे आणि मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशमन दलासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.


पुण्यातील अग्नीशमन दलात 900+ पदे आहेत, त्यापैकी 520+ पदे रिक्त !!

Agnishamak Vibhag Pune Bharti 2022 – There are 910 posts in Pune Fire Brigade, out of which 527 posts are vacant. Over the past year, there have been major fires at the Serum Institute, Fashion Street in the city. As the city expands, so does the population. The corporation has followed up with the ministry officials but it has not been approved yet. It has been three and a half years since the Directorate of Fire Services sent a proposal to the Urban Development Department to get the recruitment regulations approved to fill these vacancies. Read More information about Agnishamak Vibhag Pune Bharti 2022 at below

To Get Latest Upcoming Pune Fire Department Bharti News, Recruitment, Result, Admit Card, Exam Date click Here

महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने भरती नियमावलीला मंजूरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून साडे तीन वर्ष झाली आहेत.

मात्र, अद्यापही त्यास मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदभरती रखडली असून, ही नियमावली त्वरीत मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व घडल्या तरी त्यात जिवतनाही होऊ नये यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे अग्निशमन दल मनुष्यबळासह सुसज्ज असणे आवश्‍यक आहे याकडे लक्ष वेधत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पदभरतीची मागणी केली आहे.

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.

पुण्यातील अग्नीशमन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्याही वाढत आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजूरी दिलेली नाही. निमावलीची मंजूरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.


Agnishamak Vibhag Pune Bharti 2021 – Pune City Fire Department, PMC is under Lack Of Vacant Positions of various Posts. In Pune Mahanagrpalika Agnishamak Vibhag 910 Posts are sanctioned out of which 500+ posts are still vacant. And the unfortunate fact that there are not enough firefighters available to rush to the scene of an emergency in the event of a major fire is feared by the people of Pune. Read below Update on Agnishamak Vibhag Pune Bharti 2021 in this post

पुणे अग्निशमन विभागात तब्बल ५१३ कर्मचारी पदे रिक्त – Pune Fire Department Recruitment 2021

पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात मंजूर ९१० कर्मचारी पदांपैकी तब्बल ५१३ कर्मचारी पदे रिक्त असल्याने, शहराची अग्निसुरक्षा ‘गॅस’वर आहे. या जागा भरण्यासाठीची नियमावली गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्याचे चटके शहराच्या अग्निशमन सेवेला बसत असून, आगीची मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत तातडीने धावून जाण्यासाठी पुरेसे अग्निशमन कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी वास्तव लालफितशाहीच्या कारभारामुळे पुणेकरांना भोगावे लागण्याची भीती आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ५५ टक्के रिक्त पदे – PMC Fire Bridget Bharti 2021

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला (एनआयसीयू) लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील अग्निसुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा घटनेनंतर कमीत कमी हानी व्हावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन दलात पुरेसे कुशल कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे महापालिकेसह अनेक महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींच्या अग्निशमन दलात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८मध्ये आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली तयार केली. ही नियमावली नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली. मात्र, तीन वर्षे उलटूनही या नियमावलीला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागातील भरती रखडली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ५५ टक्के रिक्त पदे भरण्यात अडचणी येत असून, अ‌वघ्या ४५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावर हा विभाग अग्निशमन सेवेची धुरा पेलत आहे.

‘पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. एका केंद्रावर किमान नऊ ते दहा कर्मचारी असणे अपेक्षित आहे. उंच इमारतीतील आग शमविण्यासाठी लागणारी शिडी उचलण्यासाठीच चार कर्मचारी लागतात. मात्र, काही केंद्रांवर केवळ तीन ते चार कर्मचारी उपलब्ध आहेत,’ असे अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ‘दुर्दैवाने एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी आग लागल्यास पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी मदत व बचावकार्याला फटका बसेल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली

मुख्यमंत्र्यांना पत्र

अग्निशमन विभागातील रिक्त पदांसंदर्भात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीची नियमावली तातडीने मंजूर करण्याचे आदेश नगरविकास विभागाला देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ‘अग्निशमन विभागातील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे आहे. ही बाब पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना वारंवार कळवूनही विभागाकडून निर्णय घेतला जात नाही, हे दुर्दैवी आहे,’ असेही वेलणकर म्हणाले.

Vacancy Details For Agnishamak Vibhag Pune Recruitment 2021

पुणे महापालिकेचा
अग्निशमन विभाग
९१०
मंजूर कर्मचारी पदे
३९७
भरलेली पदे
५१३
रिक्त पदे
निवृत्ती, खात्यांतर्गत बदल्यांमुळे अग्निशमन विभागातील विविध कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली नसल्याने त्या जागी भरती झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी ११ गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. आता २३ गावे पालिकेत येणार आहेत. त्यामुळे अग्निशमन केंद्रांचा विस्तार केला जात आहे. सध्याच्या १४ अग्निशमन केंद्रांसाठीच पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना सुट्या देता येत नाहीत, मोठी घटना घडल्यास अन्य केंद्रांवरूनही अग्निशमन गाड्या पाठवाव्या लागतात.

Leave a Comment