AIASL मध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या १०४९ रिक्त जागांसाठी नोकरीची संधी!लवकर करा अर्ज

AIASL मध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या १०४९ रिक्त जागांसाठी नोकरीची संधी!लवकर करा अर्ज

AIASL Recruitment 2024 :

एअर इंडिया एअरपोर्ट अॅथोरिटी कस्टरमर सर्व्हिसेसमध्ये (AIASL) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती करणार आहे. या पदासाठी इच्छूक उमेदवार (पुरुष आणि महिला भारतीय नागरिक) AIASL च्या अधिकृत वेबसाइट aiasl.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर (तीन वर्षे) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध पदांसाठी इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जुलौ २०२४ आहे.

यावर्षी, या भरतीच्या प्रयत्नातून एकूण १०४९ जागांची भरती केली जाईल यापैकी सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३४३ जागांची भरती केली जाणार आहे तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाछी ७०६ पदांची भरती केली जाणार आहे.
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार १०+२+३ पद्धतीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा तसेच उमेदवराकडे भाडे, आरक्षण, संगणकीकृत प्रवासी चेक-इन, तिकीट आणि कार्गो हाताळणी यासह खालीलपैकी कोणत्याही किंवा सर्व क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार हा कॉप्युटर वापरण्यामध्ये तज्ज्ञ असावा. तसेच उमेदवाराची इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असायला हवी. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार ३३ पेक्षा जास्त वयाचा नसावा.
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार १०+२+३ पद्धतीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा. या पदासाठी A, कार्गो, किंवा एअरलाइन तिकीट, तसेच एअरलाइन डिप्लोमा किंवा IATA-UFTAA, IATA-FIATA, IATA-DGR, किंवा IATA कार्गो डिप्लोमा यांसारखे प्रमाणित अभ्यासक्रम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. सामान्य श्रेणीतील उमेदवार २८ क्षा जास्त वयाचे नसावेत.

अर्ज करण्याची थेट लिंकhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform?pli=1

अर्ज शुल्क
अर्जासह मुंबईतील “AI AIRPORT SERVICES LIMITED” ला देय असलेला डिमांड ड्राफ्ट, रु.५००/- (रुपये फक्त पाचशे) परत न करण्यायोग्य अर्ज शुल्कासह असणे आवश्यक आहे. SC/ST समुदायातील उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Leave a Comment