Anganvadi Sevika Bharti 2021

Anganvadi Sevika Bharti 2021 – जिल्ह्यातील 4 अंगणवाडी केंद्रावर मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी मिनी अंगणवाडी सेविकांची पदे भरावयाची आहेत. त्यामध्ये कोलझर येथील कोलझर टेंबवाडी, वझरे-गिरोडे येथील वझरे हळदीचा गुंडा, अंबडगाव येथील देऊळवाडी, बोडदे येथील गणेशवाडी या अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.

या भरतीसाठी संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक 14 जानेवारी 2021 ते 28 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग यांच्या कडे स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग येथे संपर्क साधावा असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प दोडामार्ग हे कळवितात.

13 thoughts on “Anganvadi Sevika Bharti 2021”

Leave a Comment