Apple Company Jobs 2022

Apple या दिग्गज कंपनीत 10 लाख लोकांना रोजगाराची संधी !!

Apple Company Jobs 2022 : Apple is the technology giant. In the near future, Apple will make a significant investment in India and strengthen its position in the Indian market. For this, the company will provide employment to 10 lakh youth across the country through employment apps and supplier partners, said the company’s vice president Priya Balasubramaniam on Thursday.

Apple ही तंत्रज्ञानातील सर्वात दिग्गज कंपनी आहे. आगामी काळात Apple भारतात लक्षणीय गुंतवणूक करुन भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम वाढवणार आहे. त्यासाठी देशभरात कंपनी १० लाख तरुणांना रोजगार Apps आणि सप्लायर्स पार्टनरद्वारे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कंपनीच्या उपाध्यक्षा प्रिया बालसुब्रमण्यम यांनी गुरुवारी सांगितले.

बंगळुरु येथील टेक समिट २०२१ मध्ये प्रिया बालसुब्रमण्यम म्हणाल्या की, गेल्या २ दशकापासून Apple भारतात कार्यरत आहे. २०१७ मध्ये बंगळुरुमध्ये आयफोनचं(I Phone) उत्पादन सुरु झालं. तेव्हापासून आम्ही इथं, चेन्नई आणि इतर भागात विस्तार करत आहोत. देशातंर्गत बाजारात आणि बाहेर निर्यात करण्यासाठी आयफोन्सची निर्मिती केली जात आहे. पुरवठादारांची साखळीसोबत भारतात आणखी गुंतवणूक करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. जास्तीत जास्त लोकल मार्केटपर्यंत आम्हाला पोहचायचं आहे असं त्यांनी सांगितले.

iPhone 11, नवीन iPhone SE आणि iPhone 12 सारखी मॉडेल्स भारतात बनवली जात आहेत. मागील वर्षी कंपनीनं भारतात ऑनलाईन स्टोअर उघडलं. थेट ग्राहकांपर्यंत उत्पादनं पोहचतील अशी सुविधा दिली. कंपनी रिटेल स्टोअरमध्ये विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. गेल्या काही वर्षापासून Apple ठळकपणे भारतीय बाजारपेठेत नावारुपाला येत आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटनुसार, Apple सप्टेंबर २०२१ मध्ये तिमाहीत २१२ टक्क्यांनी वाढणारा सर्वात मोठा ब्रँड होता. अल्ट्रा प्रमियम सेगमेंटमध्ये ७४ टक्के शेअर्ससह कंपनीनने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. iPhone 12 आणि iPhone 11 यांच्या मागणीमुळे कंपनीची वेगाने प्रगती झाली.

Apple पहिल्यांदाच प्रिमियम सेगमेंटमध्ये टॉप ५ जी स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअर रिएलिटी, ३ डी प्रिटिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात बदल होत आहेत. काही जण याला चौथी औद्योगिक क्रांती म्हणतात.

Careers at Apple

Leave a Comment