Advertisement

Arogya Vibhag Fake Recruitment

सावधान ! आरोग्य विभाग पदभरतीची बनावट जाहिरात ; वाचा संपूर्ण माहिती

Arogya Vibhag Fake Recruitment – A complaint has been lodged with the Yavatmal Police Station regarding fake advertisements circulating on social media in the name of the District Health Officer’s Office, Yavatmal.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या नावाने पदभरतीबाबत सोशल मिडीयावर फिरत असलेल्या फेक जाहिरातीसंदर्भात यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रिक्त पदाच्या सरळ सेवा पध्दतीने पदभरतीबाबत 16 मे पासून सोशल मिडीयावर फेक जाहिरात प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आली नसून फेक जाहिरातीत असलेले रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्याची कोणत्याही प्रकारची पदभरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य कार्यालयामार्फत सुरू नाही, असे कळविण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर प्रसारीत होणारी जाहिरात ही पूर्णपणे खोटी असून बेरोजगार उमेदवारांची दिशाभुल करणारी आहे. तसेच भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी असल्यामुळे नागरिकांनी या फेक जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केले आहे.

अशा प्रकारची आहे फेक जाहिरात :

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्धवेळ एमबीबीएस (1 पद), स्टाफ नर्स (6 पदे), आरोग्य सेवक (26 पदे), ए.एन.एम (7 पदे), औषध निर्माता (5 पदे) आणि लॅब टेक्निशियन (6 पद) या पदासाठी 10 ते 25 मे 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सदर फेक जाहिरातीमध्ये पदानुसार शैक्षणिक अर्हता नमुद केली असून मासिक वेतनाचासुध्दा उल्लेख आहे.


सावधान ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत भरतीचा बनावट शासन निर्णय प्रसारित

Arogya Vibhag Fake Recruitment – Fake Government GR about Recruitment in various Government Medical College and Hospital has been circulated on social media. Be aware of this Fake GR. However, the Department of Medical Education and Drugs has clarified that the government GR which is being disseminated in the social media has not been issued. Read for Update Arogya Vibhag Fake Recruitment  at below:

समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणारे हे शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक ८८८ पदांच्या निर्मितीबाबतचा बनावट शासन निर्णय २७ जानेवारी २०२२ रोजी प्रसारित करण्यात आला आहे. आणि त्याआधारे आरोग्य सेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा १८ फेब्रुवारी २०२१ रोजीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला. 

या बनावट शासन निर्णयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दर्शविले असून शासन निर्णय क्रमांकात वैसेवा -१ कार्यासनाचा उल्लेख आढळतो. मात्र समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणारा शासन निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैसेवा-१ कार्यासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व ओषधी द्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे. या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 


Arogya Vibhag Fake Recruitment  – आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत असल्याची माहिती आहे. अमरावती पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्यांपैकी काहींचे तार अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागात बनावट नियुक्तिपत्र देऊन एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती. तसेच यासंदर्भात काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहनसुद्धा केले होते. तसेच प्रकरण २५ जानेवारीला यवतमाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले.

Arogya Vibhag Fake Recruitment

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातसुद्धा असाच प्रकार घडला होता. सुरुवातीला बनावट नियुक्तिपत्र देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती अमरावतीपुरती मर्यादित असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा ही टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या टोळीतील काही सदस्यांचे अमरावती कनेक्‍शन आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Leave a Comment