Advertisement

Arogya Vibhag Nashik Bharti 2021

नाशिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती ! मुलाखतींद्वारे निवड

Arogya Vibhag Nashik Bharti 2021 – According to a new advertisement released by the Public Health Department, Nashik, under Bharari Squads under Health Department, ZP Nashik there are a total of 09 vacancies for the posts of Psychiatric Medical Officer. Candidates will get selected on the basis of Walk In Interview. Applied candidates age should be between 65 years under Psychiatric Medical Officer Nashik Bharti 2021. Interested and eligible candidates should present for the interview at mentioned address. The last date for Arogya Vibhag Zilla Parishd Nashik Bharti 2021 is  12th August 2021 for Arogya Vibhag Nashik Bharti 2021, ZP Nashik Bharti 2021.  Additional details about Medical Officer Nashik Recruitment 2021 are as given below:

Arogya Vibhag Nashik Recruitment 2021 – सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता BAMS उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती करिता दिलेल्या लिंक वर क्लिक करावे व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा… 

  • पदाचे नाव – मानसेवी वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BAMS
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक
  • मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2021

How to Apply For Arogya Vibhag Nashik Bharti 2021

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

Nashik Arogya Vibhag Vacancy 2021 Details

Department Details
National Health Mission, Nashik
Recruitment Details
Arogya Vibhag Recruitment Details & updates are given here.
Name of Posts Psychiatric Medical Officer
Total Vacancies  09 Vacancies
Selection Process Details  Walk In Interview
Official Website arogya.maharashtra.gov.in
Important Links for Nashik Health Department Bharti 2021
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


“या” जिल्ह्यातील विविध तालुक्यासाठी मंजूर असलेल्या पदांपैकी इतकी पदे रिक्त ! वाचा सविस्तर

Arogya Vibhag Nashik Bharti 2021 – In Nashik District at various Talukas, there is a total of 102 vacant posts. 171 Posts  have been sanctioned for various Taluka’s in District but 102 posts are still vacant. It includes Positions from Medical Officer to Arogya Sevak/Sevika. Read Below latest Update on Arogya Vibhag Nashik Bharti 2021 at below:

तब्बल १०२ पदे रिक्त

सध्या कोरोना महामारीने वर्षापासून आरोग्य यंत्रणा सेवेत व्यस्त आहे.सध्या नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यासाठी मंजूर असलेल्या १७१ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १०२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत असलेल्या ६९ जणांवरच मोठा ताण पडत आहे. विशेष म्हणजे तालुक्याला पूर्णवेळ आरोग्य तालुका आरोग्य अधिकारीदेखील नाही.

विविध तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येकाला १५ ते २० च्या दरम्यान गावे जोडलेली आहे. तर २५ उपकेंद्र शंभरावर गावांसाठी कार्यरत आहेत. मात्र, एवढ्या आरोग्य संस्था असताना केवळ चार वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक व सेविका मिळून तब्बल ७० पदे, तर परिचराची १४ पदे रिक्त आहेत. या मुळे आरोग्य यंत्रणेवर नक्कीच मोठा ताण पडत असल्याची स्थिती आहे. शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले असून, याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. येथेही अनेक पदे रिक्त आहेत.

अशी आहेत रिक्त पदे 

वैद्यकीय अधिकारी
मंजूर भरलेली रिक्त
16 12 04
आरोग्य पर्यवेक्षक
मंजूर भरलेली रिक्त
01 00 01
तालुका आरोग्य अधिकारी
मंजूर भरलेली रिक्त
01 00 01
औषध निर्माण अधिकारी
मंजूर भरलेली रिक्त
06 03 03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
मंजूर भरलेली रिक्त
01 00 521
आरोग्य सहाय्यक
मंजूर भरलेली रिक्त
07 06 01
आरोग्यसेवक 
मंजूर भरलेली रिक्त
38 17 21
आरोग्य सहाय्यिका
मंजूर भरलेली रिक्त
06 01 05
आरोग्यसेविका
मंजूर भरलेली रिक्त
61 13 48
कनिष्ठ सहाय्यक
मंजूर भरलेली रिक्त
07 03 04
परिचर
मंजूर भरलेली रिक्त
27 13 14

 


Arogya Vibhag Nashik Bharti 2021 – As there are vacancies for a total of 77 posts of Class 1 and Class 2 officers and specialist doctors in the district hospital, this has put a huge strain on the day-to-day running of the civil service. only three-quarters of doctors and staff are currently serving. Read below update on Arogya Vibhag Nashik Bharti 2021 at below

District Hospital Nashik Bharti 2021– नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून, सर्वप्रकारच्या सुविधा याठिकाणी आहेत. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची सुश्रुषा करण्याचे दायित्व सिव्हीलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कामकाजावर यामुळे प्रचंड ताण येत आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक उपचारांसाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्याला जिल्हा रुग्णालयाकडून प्राधान्य देण्यात येते. याठिकाणी दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार मिळतील, या विश्वासाने दाखल होतात. जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्य चिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि विशेष डॉक्टर्सची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाहीत. त्या तुलनेत केवळ तीन चतुर्थांश डॉक्टर्स आणि कर्मचारीच सध्या सेवा देत असून, सिव्हीलने कोरोना काळात नागरिकांना अत्यंत चांगली सेवा देऊन एक मानदंड प्रस्थापित केला आहे.

सुविधा परिपूर्ण मात्र

रुग्णसेवा अबाधित राहावी आणि तीदेखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध होतात. खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असली, तरी डॉक्टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या सुविधांच्या वापरावरही मर्यादा येतात.

अपुऱ्या संख्याबळातही पुरस्कार

जिल्ह्यातील नागरिक सिव्हीलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हीलमध्ये दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात, तर बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन हजारो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परततात. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी येथील कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोविड काळातही याच अनुभवाच्या बळावर जिल्हा रुग्णालयाने अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. अपुऱ्या मनुष्यबळातही सलग तीन वर्षांपासून ‘कायाकल्प पुरस्कार’ मिळवण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे.

३०३ डॉक्टरांची पदे मंजूर

जिल्ह्यात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगर परिषद रुग्णालये, पोलीस ॲकॅडमी, मध्यवर्ती कारागृह, पोलीस दवाखाना अशा एकूण ३७ रुग्णालयांसाठी डॉक्टरांची ३०३ पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे एक चतुर्थांश पदे अर्थात तब्बल ७७ पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग १ची अर्थात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची ५४ पदे रिक्त आहेत तर वर्ग २च्या २३ डाॅक्टरांची पदे रिक्त आहेत.

 

Leave a Comment