Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

महापालिकेत मंजूरीनंतरी पदभरती कधी होणार ?

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – Even after the approval in AMC, the recruitment problem in the municipality remains the same. The government has not yet approved the recruitment rules. Reservations in recruitment have also not been decided. Read when will be the recruitment process in AMC Aurangabad Bharti will be carried out and  More about Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 are as given below:

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 – आकृतीबंधाच्या मंजुरीनंतरही पालिकेतील नोकरभरतीचा पेच कायम आहे. शासनाने सेवाभरती नियम अद्याप मंजूर केलेले नाहीत. भरतीमधील आरक्षणही ठरवून देण्यात आलेले नाही.

पालिकेने ४,९७५ नवीन पद निर्मितीचा समावेश आकृतीबंधात केला होता, पण शासनाने केवळ ९५३ नवीन पदांना मंजुरी दिली. पालिकेने आकृतीबंधासोबतच शासनाकडे सेवाभरती नियमही मंजुरीसाठी पाठवले होते, पण शासनाने त्याला मंजुरी दिली नाही. त्यामुळे भरती येत्या काळात होऊ शकणार नाही असे सूत्रांनी सांगितले.

नोकरभरती करताना बिंदुनामावली निश्चित करावी लागणार आहे. त्यातून आरक्षणे निश्चित होतात. तेही झालेली नाही. शासनाने आकृतीबंध मंजूर करताना आस्थापना खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त नको अशी अट घातली आहे. पालिकेचा सध्याचा आस्थापना खर्च ३४ टक्के आहे. नवीन नोकरभरती केल्यास हा खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. हा पेच सोडवण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

पालिकेत गर्दी वाढली

आकृतीबंधाचा जीआर निघाल्यानंतर मंगळवारी पालिकेत सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी वाढली होती. कोणत्या विभागात आपल्याला संधी मिळू शकते याची चाचपणी ते करीत होते. आरक्षणाच्या मुद्याच्या आधारे काही सामाजिक कार्यकर्ते जीआरची प्रत व अन्य पूरक कागदपत्रे जमा करण्याच्या कामात लागले होते.

नऊ विभाग वाढले -त्यात ८९ पदे भरली जाणार 

शासनाने आकृतीबंध मंजूर करताना महापालिकेत नऊ विभाग वाढवले आहे. त्यात ८९ पदे भरली जाणार आहेत. पर्यावरण, परिवहन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, बाजार व परवाना, परिमंडळ कार्यालय एक व दोन, अभिलेख कक्ष एक व दोन यांचा समावेश आहे.


औरंगाबाद मनपात पाच हजार पदांची होणार नव्याने भरती !!

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – The administration has started preparations for the recruitment process as soon as the proposal is approved. According to this figure, 4,975 new posts will be recruited in the corporation. Therefore, with the sanctioned new posts, the total number of posts in the municipality will be 9,081. Additional details about Aurangabad Mahanagarpalika  Bharti 2021 as given below

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 – महापालिकेचा आकृतिबंध शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम चरणावर आहे. लवकरच तो मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. शहराचा विस्तार आणि बदलेली कार्यपद्धती यांचा विचार करुन आकृतिबंधात ही पदे वाढवण्यात आली आहेत. या आकृतिबंधानुसार पालिकेत नव्याने 4,975 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे मंजुर नवीन पदांसह पालिकेतील पदांची एकूण संख्या 9,081 एवढी होणार आहे. आकृतिबंध मंजूर होताच भरतीची प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

पालिकेत नोकर भरतीची प्रक्रिया

मागील दोन दशकांमध्ये महापालिकेतील तब्बल अडीच ते तीन हजार अधिकारी कर्मचारी निवृत्ती झाले आहेत .महापालिका प्रशासनाने मंजूर असलेली पदे ही भरलेली नाहीत .त्यामुळे सध्या महापालिकेचा डोलारा सांभाळणे प्रशासनाला अवघळ जात आहे प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा जन सेवानिवृत्त होत असल्याने सध्या अनेक पदे रिक्त झाली आहेत . या पाश्र्वभूमीवर महापालिकेने पाच वर्षापूर्वी नवीन आकृतीबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.

आकृतीबंध मंजुरीच्या अंतिम टप्यात

आता गतवर्षी 15 फेब्रुवारी 2020 रोजी पालिकेने अधिकारी कर्मचारी भरतीचा नवीन आकृतीबंध तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यात शासनाकडून वारंवार त्रुटी काढण्यात आल्या. त्या सर्वांची पुर्तताही आता पालिकेने केली आहे. आता सचिव स्तरावरुन हा आकृतीबंध मंजूर होऊन नगरविकास मंत्र्यांकडे सादर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार नगर विकास मंत्र्यांकडून तो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल. नंतर लवकरच त्यास अंतिम मंजूर मिळेल, अशी शक्यता गृहित धरून त्यानुसार प्रशासनाने नवीन नोकर भरतीची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी वाढवली आहेत पदे !

जुन्या आकृतिबंधानुसार पालिकेत सध्या 4,106 पदे मंजूर आहेत. नवीन आकृतीबंधात ही संख्या 4,975 ने वाढवून 9,081 एवढी प्रस्तावित केली आहे.

वर्ग १ ची – ८
वर्ग२ ची – १०
वर्ग ३ ची – १९०२
वर्ग ४ ची – २९८१
पदे वाढविण्यात आली आहेत.

2 thoughts on “Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021”

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..