बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मेगा भरती !

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मेगा भरती !

Bank Of Maharashtra Recruitment 2024 :

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जुलै 2024 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ही भरती सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेतून 195 पदे ही भरली जातील. इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ विभागांसाठी भरती सुरू आहे. हेच नाहीतर वरिष्ठ व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक अशीही पदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार असणार आहे.
भरतीसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. मात्र, पदानुसार वयाची अट ठेवण्यात आलीये. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. यामध्ये आपल्याला संबंधित पद आणि शिक्षणाची वयाची अट याबद्दल माहिती मिळेल. bankofmaharashtra.in. या साईटवर आपल्याला भरती संदर्भातील माहिती ही मिळेल.

महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोक मंगल’ 1501, शिवाजी नगर, पुणे या पत्त्यावर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज हा स्पीड पोस्टद्वारेच पाठवावा. 1180 रुपये फीस भरतीसाठी भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागेल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

Leave a Comment

9163