BARTI UPSC Financial Assistance Scheme

बार्टी मार्फत पात्र यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना ; येथे करा अर्ज

BARTI UPSC Financial Assistance Scheme – Financial Assistance Scheme by BARTI for candidates of Scheduled Caste of Maharashtra State to those who have qualified UPSC Civil Services Personality Test Examination 2020 are eligible to take the benefit of the Scheme.

UPSC Civil Services Financial Assistance Scheme – बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.

योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.

पात्रता :

  • उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
  • उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

असा करा अर्ज :

  • १) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
    (https://barti.in/ या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )
  • २) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
  • ३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.
  • ४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.

निवडप्रक्रिया :

बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..