Advertisement

बेळगावमध्ये 19 सप्टेंबरपासून ‘अग्निवीर’ भरती मेळावा ! – Belgaum Agneeveer Bharti 2022

Belgaum Agneeveer Bharti 2022

Belgaum Agneeveer Bharti 2022मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून बेळगावमध्ये 19 सप्टेंबरपासून ‘अग्निवीर’ भरती होणार आहे. 19 ते 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत सहा राज्यांसाठी भरती प्रक्रिया शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे होईल. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यासाठी भरती मेळावा असेल.

या भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

  • 19 सप्टेंबर : जनरल ड्युटी पद फक्त उत्कृष्टखेळाडूंसाठी 20, 21 सप्टेंबर अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्रासाठी असेल.
  • 22 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्यूटी पदासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोव्यासाठी शारीरिक क्षमता आणि तपासणी करण्यात येणार आहे
  • 23 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त कर्नाटक व आंध्र प्रदेशसाठी शारीरिक क्षमता आणि मोजमाप होणार आहे.
  • 24 सप्टेंबर : अग्रिवीर ट्रेड्समन पदासाठी सर्व जातींसाठी (फक्त लष्करात सेवा बजावणाऱ्या तसेच माजी सैनिकांसाठी) शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी होणार आहे.
  • 26 सप्टेंबर : अग्रिवीर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल पदाकरिता सर्व वर्गांसाठी भरती यात उत्तीर्ण झालेल्या सर्व पदांसाठीची लेखी परीक्षा (सामान्य प्रवेश परीक्षा) नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल.

वयोमर्यादा व पात्रता अशी हवी

  • भरती मेळाव्यासाठी उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 रोजी पुढील प्रमाणे असले पाहिजे
  • अग्निवीर जीडी, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लार्क, एसकेटी पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 199 पूर्वी अथवा 1 एप्रिल 2005 नंतर झालेला नसावा) इतकी असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असावेत. किमान 45 टक्के गुण घेऊन 10 वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • वाहनचालक पदासाठी हलके वाहन (एलएमव्ही) चालक परवाना असलेल्यांना प्राधान्य असणार आहे.
  • अग्रिवीर क्लार्क स्टोअर किपर टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतून 12 वी परीक्षा प्रत्येक विषयात 50 टक्के गुणांसह एकूण 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावे.
  • अग्निवीर ट्रेड्समन पदासाठी फक्त 10 वी उत्तीर्ण पुरेसे असले तरी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असले पाहिजेत.
  • खेळाडूंकडे विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Leave a Comment