Canara बँकेत ३००० जागांसाठी भरती सुरु !

Canara बँकेत ३००० जागांसाठी भरती सुरु !

Canara Bank Recruitment 2024 : बँकेमध्ये शिक्षण घेत पैसे कमावणे कोणाला नको असते? भारत सरकारच्या एका स्तुत्य उपक्रमाअंतर्गत कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध झाली आहे. या अप्रेंटिसशिप भरती अंतर्गत महाराष्ट्रासोबतच गोवा राज्यात एकूण ३००० जागा उपलब्ध आहेत. कॅनरा बँकेने उमेदवारांकडून अर्ज मागवले असून हे अर्ज तुम्हाला ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कॅनरा बँकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून करायचे आहेत. या जागांसाठी २० ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.

Canara Bank Recruitment 2024

पदवीधरांसाठी बँकेत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कॅनरा बँकेने ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस’च्या पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. कॅनरा बँकेमध्ये २०२४ अंतर्गत एकूण ३ हजार जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार पदवीधर आहेत ते कॅनरा बँक भरती २०२४ साठी पात्र असतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. कॅनरा बँकेची अधिकृत वेबसाइट www.canarabank.com आहे.

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – ३००० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com

अर्ज कसा करावा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अंतिम सबमिशन केल्यानंतर, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज तयार केलेल्या प्रणालीची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

Leave a Comment