CBDT And CBIC Vibhag Bharti 2021

CBDT And CBIC Vibhag Bharti 2021– देशाच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांतर्गत (सीबीडीटी) सर्व विभागात ७० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सरकारने अनेक वर्षांपासून भरती केलेली नाही. त्यामुळे कार्यालयातील कामाला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे.

ही बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी दोन्ही विभागाकडे मागितलेल्या माहितीच्या अधिकारात उपरोक्त माहिती मिळाली आहे. यामध्ये सीबीआयसीमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त आणि सीबीडीटीमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे उत्तर थूल यांना माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना मिळाली आहेत. या विभागाच्या संकेतस्थळावर पदे रिक्त असल्याची माहिती प्रकाशित केली आहे.

केंद्रीय जीएसटी नागपूर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आणि ऑल इंडिया फेडरेशन फॉर कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅन्ड जीएसटी एससी/एसटी एम्प्लाईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले संजय थूल यांनी रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. थूल म्हणाले, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कोरोनामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अशातच रिक्त पदे भरण्याची गरज आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जीएसटी संकलनावर परिणाम होत आहे.

थूल म्हणाले, काही रेंजमध्ये एक अधीक्षक आणि निरीक्षकावर काम सुरू आहे तर करदात्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अपुरे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे करदात्यांना वेळेत सेवा देण्यात अडचणी येत आहेत. महत्त्वाची कामे म्हणजे रिपोर्ट, करदात्यांसोबत पत्रव्यवहार, डिमांड नोटीस काढणे, आक्षेप निकाली काढण्यास उशीर होत आहे. या परिस्थितीचा काही असामाजिक तत्त्वे फायदा घेत असल्याने जीएसटी संकलनात घट होत आहे, असे थूल यांनी सांगितले.

सीबीआयसी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती
वर्गमंजूर पदे कार्यरत रिक्त पदे
अ ६,३८१  ३,७००  २,६८१
ब २२,२१७१  ७,३०६  ४,९११
(राजपत्रित)
ब ३२,३६२१  ७,०२६१  ५,३३६
(अराजपत्रित)
क ३०,७४०  १३,०५९  १७,६८१
एकूण ९१,७००  ५१,०९१  ४०,६०९
सीबीडीटी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती
अ ४,९२१  ४,०२८ ८९३
ब ८,३७३  ७,४९३ ८८०
क ६३,०२७३  ३,९८३२  ९,०४४
एकूण ७६,३२१४  ५,५०४ ३०,८१७

सौर्स –

लोकमत

Leave a Comment