Advertisement

CBSE 10th Result 2022: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, कसा चेक कराल?

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) दहावी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. यात राज्यातील विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवलं. आता 4 जुलै 22 म्हणजे आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावीचा निकाल घोषित केला जाण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी सीबीएसईकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर पाहता येणार आहे. देशभरामध्ये लाखो विद्यार्थी दरवर्षी सीबीएसईतून दहावीची परीक्षा देत असतात. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाची प्रचंड उत्सुकता असते. यंदा देशभरातील 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता निकाल लावण्याची मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन गुण (Internal Assessment Marks) वेळेत अपलोड करणं अत्यावश्यक होतं. परंतु, अनेक शाळांनी इंटर्नल गुण अपलोड केले नाहीत. तसंच काही शाळांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये त्रुटी असल्याचं म्हटलं होतं. या सर्व तक्रारींचा सीबीएसईकडून तपास करण्यात आला. या प्रक्रियेला वेळ लागल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला असून यासाठी उशीर लागला आहे. पण आता 4 जुलै रोजी निकाल घोषित करण्यात येईल. याशिवाय सीबीएसई 12वीचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Comment