CISF Bharti 2022 – तुम्ही बारावी पास आहात? ‘या’ पदांवर नोकरीची संधी

सध्याच्या काळात नोकरी मिळणं ही गोष्ट कठीण बनली आहे. सुशिक्षित तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोकऱ्यांची संख्या हे व्यस्त प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनामुळे  शिक्षण आणि रोजगारासह सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे बेरोजगारी अधिकच वाढली आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले लाखो युवक नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं; मात्र फार कमी जणांचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसतं. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफची पदभरती प्रक्रिया सुरू आहे. सीआयएसएफमध्ये 540 पदं भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीचं अनेकांचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (मंत्रिस्तरीय) आणि सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) ही पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार `सीआयएसएफ`च्या cifs.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

इच्छुक उमेदवार या पदांसाठी https://www.cisf.gov.in/cisfeng या लिंकवर क्लिक करूनदेखील अर्ज करू शकतात. तसंच CISF HC ASI Recruitment 2022 Notification PDF या लिंकच्या माध्यमातून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 540 पदं भरली जाणार आहेत. त्यापैकी एचसी पदासाठी 418 आणि एएसआय पदासाठी 122 जागा रिक्त आहेत.

    • ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू – 26 सप्टेंबर 2022
    • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत – 25 ऑक्टोबर 2022
    • एकूण रिक्त पदांची संख्या – 540
    • पात्रता निकष (Eligibility)उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला असावा.
    • पदांसाठी वयोमर्यादा (Age Limit)उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावं.
    • अर्जाचं शुल्कउमेदवारांना अर्ज शुल्कापोटी 100 रुपये भरावे लागतील.
    • वेतनाचा तपशील (Salary Details)
    • एचसी – वेतन स्तर 4 ( 25,500 ते 81,100 रुपये – वेतन मॅट्रिक्समध्ये)
  • एएसआय – वेतन स्तर -5 ( वेतन मॅट्रिक्समध्ये 29,200 ते 92,300 रुपये)

निवड प्रक्रिया

उमेदवारांनी फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट आणि दस्तऐवजीकरण ओएमआर/ संगणक आधारित चाचणी (सीबीटी) अंतर्गत लेखी परीक्षा, कौशल्य परीक्षा आणि मेडिकल तपासणी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

2 thoughts on “CISF Bharti 2022 – तुम्ही बारावी पास आहात? ‘या’ पदांवर नोकरीची संधी”

Leave a Comment