Dak Vibhag Bharti 2021

Dak Vibhag Bharti 2021 – There is good news for those who  wants to be a part of Central Government.  Eligible and interested candidates can apply online till 24th September, 2021 under this vacancy. According to the official notification, a total of 55 posts have been filled in the Postal Circle in Telangana. 10th pass candidates can apply for these posts under Indian Postal Department Recruitment 2021. There will be no written test. Candidates will be selected on the basis of merit. Read More details about Dak Vibhag Bharti 2021 at below:

Dak Vibhag GDS Recruitment 2021 – सरकारी नोकरी शोधताय? मग, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता टपाल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून 2357 च्या मेगा भरतीनंतर पुन्हा ‘भारतीय टपाल विभागा’कडून तेलंगणा सर्कलमधील (Telangana Circle) क्लर्क (Clerk) आणि पोस्टमन (Postman) यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण, 55 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. पोस्ट विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड या पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार असल्याचे पोस्ट अधिकाऱ्यांनी जाहिरातीव्दारे स्पष्ट केले आहे.

पोस्टात भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असून यासाठी पोस्ट विभागाच्या https://tsposts.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, आता पोस्टात 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून यासाठी जास्तीत-जास्त अर्ज करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया क्रीडा कोट्यांतर्गत केली जाणार आहे.

व्हॅकन्सी -India Post recruitment 2021

  • पोस्टल असिस्टंट – 11 पदे
  • सॉर्टिंग असिस्टंट – 08 पदे
  • पोस्टमन – 26 पदे
  • एमटीएस – 10 पदे

पात्रता

शैक्षणिक पात्रता : पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

‘पोस्टमन’ या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, शिवाय उमेदवारानं 10 वीच्या वर्गात तेलगू भाषेचा अभ्यास केलेला असावा. तसेच, तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा परवाना देखील गरजेचा आहे.

‘एमटीएस’ या पदाकरिता 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून उमेदवाराला तेलगू भाषा येणं गरजेचं आहे.

या पदांसाठी वयोमर्यादा : 18 ते 27 वयवर्षे असलेल्या ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, तर एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षे यात सूट देण्यात आलीय. त्याचबरोबर, एमटीएस पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क
सामान्य/ओबिसी/ईडब्ल्यूएस/पुरुष उमेदवारांसाठी – 100 रुपये
एससी/एसटी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क असणारा नाही.

तांत्रिक पात्रता
– मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून 60 दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र .
– ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावी किंवा उच्च वर्गात विषय म्हणून संगणकाचे शिक्षण घेतले आहे त्यांना संगणकाच्या मूलभूत माहितीच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gramin Dak Sevak Bharti 2021

🌐 अर्ज करा
जाहिरात वाचा

 

1 thought on “Dak Vibhag Bharti 2021”

Leave a Comment