अप्रेंटिस ट्रेनीच्या ८८ रिक्त पदाची DRDO मध्ये होणार भरती !

अप्रेंटिस ट्रेनीच्या ८८ रिक्त पदाची DRDO मध्ये होणार भरती !

DRDO Recruitment 2024 : DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी २८ जागांची भरती केली जाणार आहे तर डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी ६० जागांची भरती केली जाणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO-Defence Research & Development Organisation) तर्फे ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी आणि डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी अर्ज मागवले आहे. या मोहिमेंतर्गत एकूण ८८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवाराचे वय १८ वर्ष असावे.

पद संख्या(Vacancy) :  ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी २८ जागांची भरती केली जाणार आहे तर डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी ६० जागांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी पात्र उमेदवाराकडे एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवासंसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेली संस्थमधून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामधील किमान प्रथम श्रेणीने उतीर्ण पदवी शिक्षण घेतलेले असावे

डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मंजूर केलेली किंवा संबंधित राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असलेल्या संस्थेमधून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील किमान प्रथम श्रेणी उतीर्ण डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अधिकृत नोटिफिकेशन – https://drive.google.com/file/d/190Wmmxn6NakrLl84NIk0xaplYEorw5ox/view?usp=sharing

 वेतनश्रेणी (Salary Details)
निवड झालेल्या ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनीला रुपये ९००० आणि डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनीला रुपये १०,००० रुपये मानधन मिळेल.

 

Leave a Comment