Drone Pilot Recruitment 2022

लवकरच सरकार द्वारे लाखभर तरुणांची भरती होणार; कॉलेज डिग्रीची गरज नाही !!

Drone Pilot Recruitment 2022: The government will provide job opportunities to young people looking for jobs. The special is that it does not require a college degree. Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde said that in the next few years, more than one lakh drone pilots will be recruited in the country. The Center is trying to promote drone services across the country. So there will be bumper recruitment of drone pilots in the next few years. 12th pass candidates can train to become drone pilots. It does not require a college degree. About 1 lakh drone pilots will be needed in the next few years. Those who want to become drone pilots will be given two-three months of training. The drone pilot will get a monthly salary of Rs 30,000, informed Jyotiraditya Shinde.

Drone Pilot Recruitment 2022 Notification 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास १ लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होईल.

बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही. येणाऱ्या काही वर्षांत जवळपास १ लाख ड्रोन पायलट्सची आवश्कयता भासेल. ड्रोन पायलट होण्याची इच्छा असलेल्यांना दोन-तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल. ड्रोन पायलटला ३० हजार रुपये मासिक पगार मिळेल, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली.

Drone Pilot Bharti 2022

ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्लीत निती आयोगाच्या एक्सपीरियन्स स्टुडिओचं लॉन्चिंग केलं. २०३० पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचं लक्ष्य असल्याचं शिंदे म्हणाले. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment