Google for India 2021 Certificate

तरुणांसाठी गुगल करिअर सर्टिफिकेट कोर्स, गुगलतर्फे हे कोर्सेस शिकता येणार…!!

Google for India 2021 Certificate : Google, the world’s largest tech company in terms of youth skills development across the country, has given a great gift to the youth. On November 18, 2021, Google hosted the seventh edition of the Google for India 2021 event. The Google Career Certificate has been announced. In this context, a tweet has also been made from Google India’s Twitter handle.

देशभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलने तरुणांना एक मोठी भेट दिली आहे. गुगलतर्फे १८ नोव्हेंबर २०२१ रोजी, गुगल फॉर इंडिया २०२१ (Google for India 2021) इव्हेंटच्या सातव्या एडिशन पार पडली. यावेळी गुगल करिअर प्रमाणपत्र कोर्सची (Google Career Certificate) घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात गुगल इंडियाच्या ट्विटर हँडलवरून ट्विटही करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमांतर्गत तरुणांना आयटी सपोर्ट (IT Support) आणि डेटा मॅनेजमेंट , (Data management) यासारखे अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच गुगलकडून स्कॉलरशीप देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या दोन वर्षांत सुमारे १ लाख तरुणांना याचा लाभ होणार आहे.

गुगलने NASSCOM फाउंडेशन आणि टेक महिंद्राच्‍या सहकार्याने डिजीटल करिअर सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. या कोर्सची फी ६ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

देशातील करोडो लोकांना उपयुक्त आणि सुरक्षित बनविणे हे उद्धीष्ट असणारी आम्ही भारतातील पहिली कंपनी आहोत.आपण आता देशाच्या एका महत्वाच्या टप्प्यात आहोत असे गुगल इव्हेंटच्या सुरूवातीस उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले. ‘व्यावसायिक क्षेत्रात इंटरनेट खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या १२ महिन्यांत, भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. जी महामारीपूर्वीची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. भारतासाठी गुगलच्या सातव्या एडिशनचे लाईव्ह स्ट्रिमिंग अधिकृत यूट्यूब चॅनलवर करण्यात आले.

Leave a Comment