पदवीधारकांसाठी मोठ्या पगारावर बँकेत नोकरीची संधी

Graduate Jobs in Bank – सद्य परिस्थितीत करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली आहे. देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती विविध बँकेत भरती निघाली आहे. मोठ्या पगारावर नोकरी मिळण्याची संधी पदवीधारकांना आहे. आयबीपीएस मार्फत १,१६७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी भरती आयोजित कऱण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करु शकतो. बँक ऑफ इंडिया (७३४ जागा), पंजाब आणि सिंध बँक (८३ जागा) आणि युको बँक (३५०) या बँकेत १,१६७ पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांपर्यंत असावे. एससी आणि एसटीसाठी यामध्ये पाच वर्षांची सूट तर ओबीसी अर्जधारकांसाठी तीन वर्षांची सूट आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी अर्जचे शुल्क १७५ रुपये तर इतरांसाठी अर्जाचे शुल्क ७५० रुपये आहे.

मानधन –

सुधारित आयबीपीएस पीओ वेतन १ जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे.
सुधारित वेतनश्रेणी 23,700 – (980 x 7) – 30,560 – (1145 x 2) – 32,850 – (1310 x 7) -42,020. बँक पीओचा सुधारित मूळ वेतन 23,700 रुपये आहे.

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: 03, 10, 11 ऑक्टोबर 2020
  • मुख्य परीक्षा: 28 नोव्हेंबर 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS PO Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/2PnrMqb
 ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/career/

Leave a Comment