Advertisement

Home Guard Bharti 2022

शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय; लवकरच होमगार्डची भरती होणार

Home Guard Bharti 2022: The Directorate of Home Education and the Office of the Director-General have initiated proceedings regarding the appointment of the Home Guard for the safety of female students in schools of all Government and Local Self Government Institutions in Maharashtra. This will provide employment to at least 7,000 home guards in the state.

For the safety of the students, Home Guard services should be made available in all government schools in the state at the time of opening and closing of schools, the state government has instructed in a letter to the divisional deputy director of education. In this regard, a meeting was held recently under the chairmanship of the Principal Secretary of the School Education Department regarding the safety of the students.

Home Guard Recruitment

In order to provide security to school children, full-time home guards can be enlisted at the school’s opening and closing hours or during the day, the principal secretary suggested at the meeting. Accordingly, all government and local government schools in the state have been instructed by the government to check the actual number of home guards and fill in the detailed information to the Directorate immediately.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील  विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गृहरक्षक दलाचे जवान (Home Guard) नियुक्तीबाबत गृहखाते शिक्षण संचनालय व महासमादेशक कार्यालय यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील किमान सात हजार होमगार्ड सैनिकांना रोजगार मिळणार आहे.

Directorate of Home Education and Office of the Director-General

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी होमगार्डची सेवा राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य शासनाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक झाली.

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळ होमगार्डची मदत घेता येईल, असे प्रधान सचिवांनी बैठकीत सूचित केले. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची गरज आहे, ते तपासून विस्तृत महिती संचालनालयास त्वरित प्रपत्रात भरून द्यावी, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत.

पुरुष व महिला होमगार्डला सध्या दिवसाला ६७० रुपये मानधन मिळते. वर्षातून १८० दिवस ड्युटी मिळते. त्यात नवरात्र, गणेशोत्सव, निवडणुका, अन्य कार्यक्रम यांचा समावेश आहे. बाकीच्या कालावधीत होमगार्ड गवंडी, रिक्षा चालवणे, भाजीपाला विक्री अशी छोटी मोठी कामे, व्यवसाय करून कष्टाने संसाराचा गाडा ओढतात. मानधनही तोकडे असते. त्यात मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरभाडे व अन्य खर्च भागवणे अशक्य होते. होमगार्डविषयी समाजात सहानुभूती आहे. होमगार्डमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होतो. वर्षभर ड्युटी मिळावी, अशी होमगार्डसची मागणी आहे.

जिल्ह्यात २१०० होमगार्ड

विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची जबाबदारी ही होमगार्डकडे दिल्याने आम्ही ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडू, अशी ग्वाही नाशिकरोडचे रहिवासी आणि होमगार्ड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन गुणवंत यांनी दिली आहे. नांदेड येथे एक जूनपासून तीनशे पुरुष व शंभर होमगार्ड नियुक्त करण्याचे आदेश पारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळांमध्येही लवकरच होमगार्ड नियुक्ती केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जिल्ह्यात २१०० होमगार्ड आहेत. त्यापैकी पाचशे पुरुष व दोनश महिला होमगार्डंना या आदेशाचा लाभ होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले

Leave a Comment