HPE Code Wars 2022 Registration

HPE Code Wars 2022 Registration – If you also study between 9th to 12th standard then there is good news for you. Coding competition is being organized for the students of class 9th to 12th. The winners will be given a prize of Rs 3 lakh. Codingal has announced HPE Codewars- 2022 () for the students. Students participating in this competition have an opportunity to win a prize of Rs 3 lakh along with HPE and STEM.org identity certificates. More than 10,000 children from over 500 schools are expected to participate in the competition. Please note that there is no registration fee to participate in this contest. That means registration is free. Also HPE technicians will guide the students. The winners will receive a prize as well as a chance to interact with the HPE Spaceborne Computer-2. More details about HPE Code Wars 2022 Registration are as given below

HPE Code Wars 2022 Registration

जगभरात प्रोफेशनसल्ससह आता शालेय विद्यार्थ्यांमध्येही कोडिंगबद्दलच (Coding for School students) आकर्षण वाढत आहे. भारतातील काही विद्यार्थीही निरनिरळ्या प्लॅटफॉर्म्स वरून कोडिंग (Coding learning Platforms) शिकत आहे. म्हणूनच कोडींगलनं HPE कंपनीसोबत मिळून देशभरातील 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर एक कोडिंग स्पर्धा (HPE Code Wars 2022) आयोजित केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कोडिंग करावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं कोडिंग उत्तम आणि परफेक्ट असेल अशा विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोड शिकण्यासाठी आणि वास्तविक जीवनातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली (Coding competition by HPE) जाणार आहे.

ही स्पर्धा नामांकित कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी हेवलेट पॅकार्ड एंटरप्राइझच्या (HPE) सहकार्याने आयोजित केली जाणार आहे. भारतभरातील 500 हून अधिक शाळांमधील 10,000 हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. Golden Chance! पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्णांसाठी Jobs; इतका मिळणार पगार कसं असेल स्पर्धेचं स्वरूप हॅकाथॉनसाठी, विद्यार्थी वैयक्तिकरित्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्यांचा समावेश असलेला संघ म्हणून भाग घेऊ शकतात.

CodeBattle साठी, विद्यार्थ्यांना C, C++, Java आणि Python मधील कोणतीही प्रोग्रामिंग भाषा वापरून तीन तासांत 25 कोडिंग-संबंधित समस्या सोडवणे आवश्यक असणार आहे. काय मिळणार बक्षीस या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 3 लाखांचं बक्षीस जिकंण्याची संधी मिळणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना HPE कंपनीच्या काही तंत्रज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे.

विशेष आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विजेत्यांना सध्या अंतराळात असलेल्या HPE Spaceborne Computer-2 (SBC-2) शी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसंच SBC-2 साठी कोडिंग करण्याची आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचीही संधी मिळणार आहे. कधीपासून सुरु होईल स्पर्धा ही स्पर्धा इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. येत्या 9 एप्रिल पासून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

How To Apply For HPE Coding competition 2022

विद्यार्थ्यांना यासाठी विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. Corporate क्षेत्रात काम करणं सोपं नाही; पण ‘हे’ स्किल्स असतील तर मिळेल Success काय म्हणतात आयोजक “CodeWars India Edition चे आयोजन करण्यासाठी HPE सोबत सलग दुस-यांदा भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, विद्यार्थ्यांना कोडिंगची ओळख करून देणे आणि त्यांच्यासमोर असलेल्या संधींची त्यांना जाणीव करून देणे हे समान ध्येय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी ब्लॉकचेन, इत्यादीसारख्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उद्याचे जग अधिकाधिक वाढले जाईल आणि भविष्यातील काही सर्वोत्तम करिअर संधी या तंत्रज्ञानाचा विकास करून समस्या सोडवण्यासाठी वापरल्या जातील. त्यामुळे प्रत्येक शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्याला संगणक शास्त्राची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे, असा आमचा विश्वास आहे.” असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे.

1 thought on “HPE Code Wars 2022 Registration”

Leave a Comment