IGNOU Startup Competition ,इग्नू आयोजित करत आहे स्टार्ट-अप स्पर्धा !

IGNOU Startup Competition ,इग्नू आयोजित करत आहे स्टार्ट-अप स्पर्धा !

IGNOU Startup Competition 2024 :

IGNOU मध्ये स्टार्ट-अप स्पर्धा २०२४ सुरू होत आहे. या स्पर्धेत स्टार्ट-अप, बिझनेस व्हेंचर सुरू केलेले उद्योजक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत उद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप बद्दल किंवा त्यांच्या बिझनेस व्हेंचरबद्दल सर्व माहिती सादर करायची असणार आहे. ही सगळी माहिती इग्नू कडून पुरवण्यात आलेल्या गुगल फॉर्म द्वारे जमा करायची आहे.
IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे दरवर्षी स्टार्ट-अप स्पर्धा घेतली जाते. नॅशनल सेंटर फॉर इनोव्हेशन इन डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच NCIDE च्या अंतर्गत असलेल्या संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल म्हणजेच IIC ने वर्ष २०२४ मधील IGNOU स्टार्ट-अप स्पर्धा जाहीर केली आहे. IIC च्या सहकार्याने शिक्षण संस्थांमध्ये उद्योगांच्या नवकल्पना आणि स्टार्ट-अप इकोसिस्टीमची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम आखले जातात. याचाच एक भाग म्हणजे ही स्टार्ट अप स्पर्धा. ही स्पर्धा आता सुरू होत असून, त्यात ज्या उद्योजकांना सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी इग्नू तर्फे गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहेत.

Two Rounds of Startup Competition: IGNOU स्टार्ट-अप स्पर्धा २०२४ मधील पहिल्या फेरी ही स्टार्ट-अप, किंवा बिझनेस व्हेंचर विषयीची सर्व माहिती सादर करणे ही असणार आहे. या पहिल्या फेरीत इच्छुक उद्योजक गुगल फॉर्म मध्ये ही सर्व माहिती भरून तो सबमिट करू शकतात. विविध उद्योजकांनी त्यांच्या स्टार्टअप विषयी गुगल फॉर्मच्या माध्यमातून दिलेली माहितीची पडताळणी आणि तपासणी तज्ञ समिती द्वारे केली जाईल. पहिल्या फेरीतून निवडक उद्योजकांची निवड पुढच्या म्हणजेच दुसऱ्या फेरीसाठी केली जाईल.
स्टार्ट-अप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप, किंवा बिझनेस व्हेंचरचे पिच सादर करायचे असेल. या फेरीच्या शेवटाला निवडून आलेल्या उद्योजकाला बेस्ट स्टार्ट-अप अवॉर्ड २०२४ देऊन गौरवण्यात येईल. या पुरस्काराने त्या नव उद्योजकाला प्रोत्साहन तर मिळेलच सोबत या पुरस्काराचा फायदा त्याच्या स्टार्ट-अप ची अधिक वाढ करण्यात देखील होणार आहे.
IGNOU Startup Competition Eligibility: असे उद्योजक ज्यांनी यशस्वीरित्या स्टार्ट-अप व्यवसाय उभा केला आहे, ज्यांनी स्टार्ट-अप व्यवसाय सुरू केला आहे, किंवा ज्यांचा स्टार्ट-अप व्यवसाय प्रगतीच्या वाटेवर आहे असे सर्व उद्योजक IGNOU च्या स्टार्ट-अप स्पर्धा २०२४ चा भाग होऊ शकतात. त्यातून पुढच्या फेरीसाठी उद्योजकांची निवड केली जाईल.

स्टार्ट-अप स्पर्धा २०२४ मधील पहिल्या फेरीसाठीचे गुगल फॉर्म ची लिंक उद्योजकांना http://ignou.ac.in//userfiles/Notification%20%20Startup%20Competition-2024.pdf या लिंकवर क्लिक केल्यावर मिळेल. स्टार्ट-अप स्पर्धेत भाग घेण्यासाठी हा फॉर्म भरणे आवश्यक असून त्यासाठी ३१ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी IGNOU च्या www.ignou.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment