देशभरातील प्रज्ञावंतांची पसंती IIT Bombay !

देशभरातील प्रज्ञावंतांची पसंती IIT Bombay !

IIT Bombay Admission Process : या सर्वांचाच परिपाक यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशांदरम्यान दिसून आला. यंदा जेईई परीक्षेत देशभरातून अव्वल दहापैकी दहाही विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईतच प्रवेश घेतले. पहिल्या २५ पैकी २४ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईचा पर्याय निवडला. पहिल्या ५० मधून ४७ विद्यार्थ्यांनी आणि पहिल्या १०० पैकी ७२ विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घेण्यास पसंती दिली.

देशभरातील शैक्षणिक संस्थांचे रँकिंग ठरवणाऱ्या ‘एनआयआरएफ’च्या यादीनुसार आयआयटी चेन्नईने भलेही पहिले स्थान पटकावले असले, तरी देशभरातील प्रज्ञावंतांनी मात्र आयआयटी मुंबईच दर्जेदार असल्याचे दाखवून दिले आहे. आयआयटीमधील प्रवेशासाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत अव्वल १०० ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७२ विद्यार्थ्यांनी आपली पहिली पसंती आयआयटी मुंबईला देत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या एक हजार मुलांपैकी जवळपास २५ टक्के म्हणजे २४६ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत प्रवेश निश्चित करत दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत आयआयटी मुंबईला पर्याय नसल्याचेच सुचवले आहे.

आपल्या संशोधनाद्वारे देशाच्याच नाही, तर मानवजातीच्या विकासात मोलाची भर घालणारे अनेक संशोधन आयआयटी मुंबईमधूनच घडले. आयआयटी मुंबईचा दबदबा जागतिक स्तरावरही आहे, हे विविध जागतिक रँकिंमधून दिसून येते. हाच दबदबा आता प्रवेशाच्या माध्यमातूनही दिसून आला. आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उत्सुक असल्याचे यंदाही स्पष्ट झाले.

यंदा झालेल्या प्लेसमेंट्सनुसार आयआयटी मुंबईतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी २३.५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. म्हणजेच येथून बाहेर गेलेल्या मुलाला सरासरी दोन लाख रुपये दरमहा पगाराची नोकरी मिळाली. त्याशिवाय आयआयटी मुंबईच्या कॅम्पसवर उद्योजकतेलाही वाव मिळतो, हे वारंवार विविध उपक्रमांमधून सिद्ध झाले आहे.

या सर्वांचाच परिपाक यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशांदरम्यान दिसून आला. यंदा जेईई परीक्षेत देशभरातून अव्वल दहापैकी दहाही विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईतच प्रवेश घेतले. पहिल्या २५ पैकी २४ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईचा पर्याय निवडला. पहिल्या ५० मधून ४७ विद्यार्थ्यांनी आणि पहिल्या १०० पैकी ७२ विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घेण्यास पसंती दिली.

Leave a Comment