लष्करात मिशन ‘अग्निपथ’, अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु- Indian Army Agniveer Bharti 2022

Indian Army Agniveer Bharti 2022 – Indian Army Agniveer  Application process 2022 is started from today through Army Portal. The registration link & other details are given below.

अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती. अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे. यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला. आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे. लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल. हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील. चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल.

 

त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.

 

अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील. ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल. 16ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

 

1 thought on “लष्करात मिशन ‘अग्निपथ’, अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु- Indian Army Agniveer Bharti 2022”

Leave a Comment