आजपासून आर्मीत महिला उमेदवारांची भरती सुरु !! – Indian Army Female Bharti 2022

Indian Army Female Bharti 2022 – भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन देशाचे संरक्षण करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२२ पासून भारतीय सैन्यदलामध्ये टेक्निकल कॉर्प्समध्ये पुरुषांसह महिलांची देखील भरती होणार आहे.

यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले असून इच्छूक आणि पात्र महिला ऑफिशिअल भरती पोर्टल, joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज पाठवू शकता. सेन्याद्वारे एसएससी(टेक)साठी अर्जाची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२२ आहे. 

भारतीय सैन्य दलामध्ये भर्ती संचालनालयद्वारे एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 26 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार,

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) मध्ये 59 व्या अभ्यासक्रमासाठी पुरुष आणि 30 व्या अभ्यासक्रमासाठी महिलांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. आर्मी एसएससी (टेक) भर्ती 2022 अंतर्गत, ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणाऱ्या कोर्ससाठी पुरुष आणि महिलांसाठी भरती केली जाईल.

 

Army Recruitment 2022: अर्ज प्रक्रिया

  • अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यावर, joinindianarmy.nic.in या अधिकृत भर्ती पोर्टलला भेट द्या.
  • येथे ‘ऑफिसर्स एन्ट्री अप्लाय’ विभागात जाऊन अर्ज करा.
  • यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज करावा लागेल.

Leave a Comment