भारतीय तटरक्षक दलाचे Admit Card जारी

Indian Navy Admit Cards 2021 – इंडियन कोस्ट गार्ड अर्थात भारतीय तटरक्षक दलानं (ICG) नाविक आणि मेकॅनिकल पदांच्या भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय. आयसीजीनं सोमवारी 27 सप्टेंबर 2021 रोजी सेलर आणि मेकॅनिकलच्या पदांबाबत एक अधिसूचनाही जारी केलीय.

दरम्यान, ज्या उमेदवारांनी नाविक आणि भारतीय तटरक्षक दलात मेकॅनिकल पदांसाठी अर्ज केलाय, त्यांच्यासाठी लॉगिन पेजवर परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वत: ची नोंदणी केली होती, ते आता नाविक आणि यांत्रिक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या joinindiancoastguard.cdac.in अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येऊ शकतं.

भारतीय तटरक्षक दलानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, परीक्षा तारखेच्या 24 ते 48 तास आधी प्रवेशपत्र दिले जाते. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर सूचनाही पाठवली जाते. उमेदवार, लॉगिन क्रेडेन्शियल जसं ईमेल आयडी आणि पासवर्ड इत्यादी वापरून अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

Leave a Comment