IUCAA पुणे भरती ; पुणे शहरात नोकरीची संधी !

IUCAA पुणे भरती ; पुणे शहरात नोकरीची संधी !

IUCAA Pune Recruitment 2024 : पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्रात नोकरीसाठी भरती होणार आहे. जाणून घ्या पदाचे नाव आणि अर्ज प्रक्रिया.

आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र, पुणे इथे ‘वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी’ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वेतन यांबद्दलची माहिती पाहा. तसेच अर्ज कुठे आणि कसा करावा तेदेखील जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे पुढील शिक्षण आवश्यक आहे.
५५ टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी असावी.
तसेच उमेदवार किमान आठ वर्षांचा अनुभवी कर्मचारी असावा / किंवा त्याला खरेदी आणि स्टोअर / सरकारी फायनान्स आणि अकाउंट्स
वेतन
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदावर भरती होणाऱ्या उमेदवारास एक लाख ४६ हजार ८३६ रुपये इतके वेतन दिले जाईल.

आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र अधिकृत वेबसाइट
https://www.iucaa.in/en/

नोकरीसंदर्भातील अधिसूचना (Notification ) : https://drive.google.com/file/d/13s3gjELHU6SSCb3ZTQBhUeB8TTc1vYKf/view?usp=sharing

पदसंख्या : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदासाठी रिक्त पदे – एक जागा

अर्ज प्रक्रिया : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जामध्ये आवश्यक आणि अचूक माहिती उमेदवाराने भरावी.
तसेच आवश्यक असतील ती कागदपत्रे जोडावीत.
इच्छुक उमेदवाराने वरील पदासाठी अर्ज हा अंतिम तारखेआधी भरणे गरजेचे आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही ६ एप्रिल २०२४ अशी आहे.
नोकरीसाठी अर्ज भरण्याआधी उमेदवाराने नोकरीची अधिसूचना नीट वाचून आणि समजून घ्यावी.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारास या नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र, पुणेच्या अधिकृत वेबसाइटला भट द्यावी अथवा नोकरीसंदर्भातील अधिसूचना वाचावी. वेबसाइट व अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

 

 

Leave a Comment