Jalsampada Vibhag Bharti – Exam Update

Jalsampada Vibhag Bharti Exam – The online examination of Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted) Saralseva Recruitment Examination 2019-2020 was to be held on 25/11/2019 and 26/11/2019 through Mahapariksha Portal, however due to some unavoidable reasons this examination is postponed. It is planned to examine only the candidates who applied in the year 2019 without any change in the terms and conditions of the advertisement published in the year 2019 for the post of Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted).

महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 25/11/2019 व 26/11/2019 रोजी घेण्यात येणार होती, तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. उपरोक्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या पदासाठी सन-2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल न करता फक्त सन-2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचीच परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना फक्त परीक्षा केंद्रामध्ये बदल, ई-मेल व मोबाईल नंबर बदल व आरक्षण संवर्ग या बाबींमधील बदल करण्यास स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.

सदर लिंक, हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम व इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थव्यवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

Leave a Comment