Jalsampada Vibhag Recruitment 2021

Jalsampada Vibhag Recruitment 2021 – The Department of Water Resources had published advertisement for the post of Junior Engineer (Architecture) Group ‘B’. The advertisement was published in 2019 and the last date for filing applications was August 15, 2019. Millions of young people have applied for the exam. Despite the completion of two and a half years, the post has not been examined yet. On 11th November 2021, the State Government has published the relevant Government Resolution. While millions of graduates across the state are waiting to be recruited for this post. Yuvasena has been assured to complete the recruitment soon. More details about Jalsampada Vibhag Recruitment 2021 are as given below

राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. अनेक तरुण बेरोजगारीस त्रस्त होऊन सध्या आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागातील प्रलंबित पदभरती तातडीने करावी, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी निवड समिती अध्यक्षांकडे केली.

त्यावर भरती लवकरच पुर्ण करण्याचे आश्‍वासन युवासेनाला देण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ‘ब’ या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. 2019 मध्ये ही जाहिरात प्रकाशित झाली असून 15 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. लाखो तरुणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अडीच वर्षे पूर्ण झाले असून देखील अद्याप या पदाची परीक्षा झालेली नाही. 11 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यशासनाने या संबंधित शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

यानुसार राज्यस्तरीय निवड समिती मध्ये काही बदल केले आहेत. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत गुणाले यांची भेट घेऊन तातडीने प्रलंबित पद भरती पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले.

राज्यभरात लाखो पदवीधारक तरुण या पद भरतीची वाट पाहत असताना फक्त प्रशासकीय दिरंगाई या तरुणांना मानसिकरित्या खचवण्याचं काम करत आहे. त्यामुळे ही पद भरती तातडीने करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येणार आहे. गुणाले यांना विधी व न्याय विभागाचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्याबाबतविनंती केली असल्याचे यादव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी न खचता अभ्यास करावा.परीक्षा लवकरात लवकर होईल यासाठी युवासेना सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळास स्पष्ट केले.

भरती प्रकरण हे न्यायालयाने दिलेल्या आरक्षणा बाबतच्या निकाला नंतर विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहे. संबंधित विभागाचा अहवाल येताच तातडीने याबाबतची पूढील कार्यवाही पूर्ण करणार असून परीक्षा लवकरचं होतील, अशी ग्वाहीही हनुमंत गुणाले यांनी दिली.


Jalsampada Vibhag Recruitment 2021 – श्रीगोंद्यातील सरकारी कार्यालयांत कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. तलाठ्यांपासून तर पाटकऱ्यांपर्यंत कोणीही जागेवर सापडत नसल्याने लोकांची कामे रखडल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसते आहे. त्याचे खरे कारण, सरकारी कर्मचारी पगारापुरतेही काम करीत नाहीत असे मुळीच नसून, महत्त्वाच्या कार्यालयांत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्तच असल्याने सावळा गोंधळ सुरू आहे.

श्रीगोंदे शहरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कुकडी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोळवडी, घोड प्रकल्प, मढेवडगाव, श्रीगोंदे, सीना, खैरी, नगर लघुपाटबंधारे, करमाळा कालवा यांवरील उपअभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. तीन उपअभियंते नाहीत, २९ सहायक अभियंते नाहीत, दप्तर कारकुनांच्या ७२ रिक्त जागा आहेत. ११३ मोजणीदार नाहीत, कालवा निरीक्षकांच्या २३० जागा रिक्त आहेत. कालवा चौकीदार ७९ ठिकाणी नाहीत. हा विभागच राम भरोसे असून, घोड प्रकल्पात तर कोणीच राहिले नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

कुठे व कशा आहेत रिक्त जागा?

कुकडी विभाग क्रमांक दोन ः मंजूर पदे- ३६, रिक्त पदे- १७
सीना प्रकल्प, मिरजगाव ः मंजूर पदे १२३, रिक्त पदे- १०८
घोड प्रकल्प, मढेवडगाव व शिरूर ः मंजूर पदे २४६, रिक्त पदे- २०१
कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदे ः मंजूर पदे- १६७, रिक्त पदे- १३२
कुकडी उपविभाग, करमाळा ः मंजूर पदे -१०१, रिक्त पदे- ९६
कुकडी उपविभाग, राशीन ः मंजूर पदे- १८, रिक्त पदे १३
लघुपाटबंधारे उपविभाग, नगर ः मंजूर पदे-७९, रिक्त पदे ५०
लघुपाटबंधारे उपविभाग, जामखेड ः मंजूर पदे- १०१, रिक्त पदे ८४
कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण मंजूर पदे- ८७१, रिक्त पदे ७०१

Leave a Comment