खूशखबर! आता 60 वर्षांनंतरही काम करणं शक्य; ज्येष्ठ नागरिकांसाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज
Job Vacancy For Senior Citizen 2021 – The government has decided to start an employment exchange for senior citizens. Efforts will be made to provide new jobs to senior citizens through this exchange. Know More about Job Vacancy For Senior Citizen 2021 , Registration For Senior Citizen Jobs 2021 at below
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदाच्या ज्येष्ठ नागरिक दिनी भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या संधींचं दालन उघडणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज (employment exchange for senior citizen) सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या एक्स्चेंजच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी (jobs for senior citizen) मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे एक्स्चेंज 1 ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही (helpline for senior citizen) सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल.
ज्येष्ठ नागरिकंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी सरकारने ‘एल्डर लाइन’ नावाची देशव्यापी टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. 14567 हा हेल्पलाइन नंबर असून, या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, कायदेशीर समस्या, भावनिक आधार, छळाच्या विरोधात मदत, बेघर झाल्यास मदत आदी साह्य मिळू शकेल.
60 वर्षांनंतरही काम करणं शक्य असलेल्या आणि नोकरी करण्याची इच्छा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय ‘सीनियर एबल सिटीजन्स फॉर री-एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी’ नावाचं पोर्टल सुरू करणार आहे देशात प्रथमच अशा प्रकारचं रोजगार केंद्र उघडलं जात आहे. त्यामध्ये स्वतःची नोंदणी करून ज्येष्ठ नागरिक स्वत:साठी रोजगार शोधू शकतील.
हे एक परस्परसंवादी व्यासपीठ असेल. त्यावर भागधारक एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील आणि रोजगाराच्या संधींबद्दल बोलतील, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने सीआयआय (CII), फिक्की (Ficci) आणि असोचेम (Assocham) यांसारख्या उद्योग संघटनांना पत्र लिहून त्यांना ज्येष्ठ नागरिकांना रोजगार उपलब्ध करू देण्यास मदत करण्यास सांगितलं आहे. या पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं शिक्षण, अनुभव, कौशल्य, आवडी इत्यादींची माहिती द्यावी लागेल. हे एक्स्चेंज रोजगाराची हमी देत नसल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांची पात्रता आणि त्यांची कंपनीला असलेली गरज लक्षात घेऊन त्यांना नोकरी देणं हा सर्वस्वी कंपन्यांचा निर्णय असेल; मात्र यातून संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.