अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांची भरती

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR Bharti 2021 – मित्रानो, प्राप्त बातमी नुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे. या भरती अंतर्गत अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. थेट मुलाखतीतून उमेदवाराची निवड होणार आहे.

महाराष्ट्र पब्लीक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६ सेक्शन १०३ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. विशिष्ट कालावधीसाठी ही भरती असणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये ही भरती होणार आहे.

दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी MC हॉल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर या पत्त्यावर यायचे आहे. मुलाखतीना येताना शैक्षणिक, अनुभव दर्शविणारी महत्वाची कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.

मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील पदभरतीचे नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. कागदपत्रांमध्ये काही गोंधळ आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि नियमानुसार कारवाई होऊ शकते.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment