खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित-०३ नोव्हेंबर 2021 पर्यंत करा ई-मेल !!
Khelo India Maharashtra Bharti 2021 – The selection process for the sport of cycling has been organized under the Khelo India Expertise Center jointly by the state and central governments to produce international athletes. Players appearing for the test should be born between January 2007 and 2009. • All state and national level participating athletes (date of birth should be between January 2007 to 2009) will be able to appear directly for the state level test. Know More about Khelo India Maharashtra Bharti 2021 at below
Khelo India Maharashtra Bharti 2021
आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
Maharashtra Khelo India Cycling Selection Process – निवड प्रक्रिया
जिल्हास्तरावर २ मुले आणि २ मुलींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण गुणानुक्रमे प्रथम आलेले २ मुली आणि २ मुले यांना राज्यस्तर निवडचाचणी करिता पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तर निवडीसाठी जे खेळाडू सायकलिंग या खेळात राज्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग झालेले आहेत व ज्या खेळाडूंची जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान आहे. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत चाचणीस उपस्थित राहता येईल.
Khelo India Maharashtra Application Form- अर्ज कुठे करायचा
- जिल्हास्तर निवड चाचणी दि 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 8.00 वा. भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली येथील ट्रॅकवर घेण्यात येईल. चाचणीकरीता इच्छुक खेळाडू यांनी आपली संपूर्ण माहिती पूर्ण नाव, संपर्क क्र. dsomumbaisub2020@gmail.com वर दि ०३ नोव्हेंबर 2021 पर्यंत ई -मेलद्वारे कळवावी
- चाचणीसाठी येणा-या खेळाडू यांची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी. • राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेले खेळाडू (जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान असावी) यांना राज्यस्तर चाचणीकरिता थेट उपस्थित राहता येणार आहे अशा सर्व खेळाडू यांनी त्यांचे सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र सर्व तपशीलासह माहिती या कार्यालयास dsomumbaisub2020@gmail.com वर दि 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत ई मेल द्वारे पाठवून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केलेले आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents